Team Lokshahi
ताज्या बातम्या

नागपूर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत तीन जणांची हत्या

नागपूर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात तीन जणांची हत्या झाल्याच्या घटना घडल्या आहेत. नागपूरच्या इमामवाडा, पाचपावली आणि ग्रामिणच्या बुट्टीबोरी येथे या घटना घडल्या आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

कल्पना नळसकर असूर, नागपूर

नागपूर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात तीन जणांची हत्या झाल्याच्या घटना घडल्या आहेत. नागपूरच्या इमामवाडा, पाचपावली आणि ग्रामिणच्या बुट्टीबोरी येथे या घटना घडल्या आहेत. पहिल्या घटनेत नागपूरच्या इमामवाडा भागात दोन मजुरांनी संगनमत करून मित्राची हत्या केली,त्यानंतर मृतदेह विहिरीत फेकून दिला होता. तर दुसऱ्या घटनेत पाचपावली भागात तिघांनी मिळून एकाची हत्या केली. तर तिसऱ्या घटनेत जिल्ह्यातील बुटीबोरी येथे पोलीस खबऱ्या असल्यावरून दोघांनी सुनील भजे नामक इसमाची हत्या केली.

महत्वाचे म्हणजे तीनही प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. यातील हत्येची पहिली घटनेतील इमामवाडा भागातीलरामसिंग ठाकूर असे मृतक इसमाचे नाव आहे. किरकोळ वादातून दोन मजुरांनी संगनमताने रामसिंगची हत्या केल्याचं स्पष्ट झाले आहे. मृतक रामसिंग ठाकूर आणि आरोपी राजू बुरडे मुकेश अंबुरे हे तिघेही मजूर असून इमामवाडा येथील झोपडपट्टीत एकत्र राहत होते. तिघांना दारूचे व्यसन असून क्षुल्लक कारणावरून तिघांमध्ये वाद झाला. या वादातून राजू आणि मुकेश यांनी रामसिंगच्या डोक्यावर वार केले ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपींनी रामसिंगचा मृतदेह विहिरीत फेकून दिला. दोन्ही आरोपींची चौकशी केली असता आरोपींनी हत्या केल्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

तर हत्येची दुसरी घटनाही पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या लष्करीबाग भागात घडली आहे. रोशन शंकर बिहाडे असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.काल रात्री साडे बारा वाजताच्या सुमारास तिघांनी चाकु आणि लोखंडी रोड रोशनवर हल्ला केला. ज्यामध्ये रोशनचा मृत्यू झाला आहे. आरोपी वीरेंद्र. यशोदास आणि अश्विन या तिघांसोबत रोशनचा तिघांसोबत वाद सुरू होता. त्याच वादातून तिघांनी मिळून हत्या केल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी तीनही आरोपींना अटक केली आहे. हत्येची तिसरी घटनाही नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरीच्या टाकळघाट परिसरातील गंगापूर शिवारात झाली आहे. सुनील गुलाबराव भजे असे हत्या झालेल्या इसमाचे नाव आहे. सुनील पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरून दोघांनी लोखंडी रोडने हल्ला करून त्यांची हत्या केली. दिलीप गेडाम आणि वंश उर्फ दादू मांजी असे आरोपींचे नावं असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा