विवाहित असून सोशलमीडियावर मुलींना अविवाहित असल्याचे सांगून जाळ्यात अडकवणाऱ्या नवऱ्याची बायकोने चांगलीचं जीरवली. बायकोने फेक इन्स्टाग्राम अंकाऊट सुरु केले. त्यानंतर नवऱ्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून त्याची गर्लफ्रेंड बनवून त्याच्यासोबत बोलू लागली. नंतर दोघांच भेटायचं ठरलं. त्यानंतर गर्लफ्रेंड बनवून बायको नवऱ्यासमोर आली. नंतर नवऱ्याच्या चेहऱ्यांचा रंग पूर्ण उतारला होता.
नेमकं प्रकरण काय?
ग्वाल्हेरमधील एका विवाहित महिलेने आपल्या पतीवर संशय व्यक्त केला होता की तो तिची फसवणूक करत आहे. पतीच्या वागण्यातील बदल आणि त्याच्या सततच्या गोष्टी लपवण्याच्या वर्तनामुळे तिला शंका आली. याचा छडा लावण्यासाठी तिने एक स्मार्ट युक्ती वापरली. तिने इन्स्टाग्रामवर एक बनावट प्रोफाइल तयार केले आणि स्वतःला एका तरुणीच्या रूपात सादर केले.
या प्रोफाइलद्वारे तिने पतीशी गप्पा मारायला सुरुवात केली. 2 महिन्यानंतर दोघांनी भेटायचं ठरवले. एका हॉटेलमध्ये भेटायचे ठरवले होते. स्वतः तिथे हजर राहिली. जेव्हा पती ठरलेल्या ठिकाणी पोहोचला, तेव्हा त्याला समोर आपली पत्नी दिसली. यामुळे पती आश्चर्यचकीत झाला. त्याच्या चेहऱ्याचा रंगच निघून गेला. पत्नीला पाहून त्याने ऑफिसच्या कलिक भेटायला आलो, असे सांगितले. बायकोने सगळे मेसेज त्याला दाखवले. त्यानंतर पत्नीने त्याच्या विरोधात फसवणुकीबद्दल गुन्हा दाखल केला. इन्स्टाग्रामवरील चॅट्सचा पुरावा दाखवला. यानंतर, तिने ग्वाल्हेर पोलिस ठाण्यात पतीविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी पतीवर फसवणूक आणि व्यभिचारी वर्तनाचे आरोप लावले असून, तपास सुरू आहे.