Tibet no fly zone 
ताज्या बातम्या

Tibet: व्यावसायिक विमान वाहतुकीसाठी तिबेटचे पठार धोकादायक

तिबेटचे पठार व्यावसायिक विमान वाहतुकीसाठी धोकादायक का आहे? जाणून घ्या उंची, हवामान बदल आणि भूगोलाचे आव्हान काय आहे? जाणून घ्या.

Published by : Gayatri Pisekar

विमान प्रवास हा जितका रोमांचक असला तरी तितकाच तो आव्हानात्मकही आहे. जगात असे अनेक प्रदेश आहेत, जिथे उड्डाण करणं आव्हानात्मक आहे आणि असेच एक क्षेत्र आहे तिबेटचे पठार आहे.

तिबेटचे पठार

हे पठार अंदाजे २.५ दशलक्ष चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेलं असून, सरासरी ४,५०० मीटर उंचीवर आहे. समुद्रसपाटीपासून त्याची सरासरी उंची फक्त पाच किलोमीटर आहे. पठाराचा आतील भाग सपाट आहे; ज्यामध्ये अंतर्गत निचरा, पर्जन्य आणि कमी धूप दर आहेत. यामुळे अनेक भौगोलीक आव्हानं निर्माण होतात; ज्यामुळे व्यावसायिक विमानांना उड्डाण करणे कठीण होते.

जेव्हा-जेव्हा या पठारावरून उड्डाण करण्याचे प्रयत्न झाले तेव्हा-तेव्हा धोक्याची परिस्थिती निर्माण झाली.

  • १९९२ मध्ये चायना एअरलाइन्स फ्लाइट ३५८ या प्रदेशातून उड्डाण करत असताना टरब्यूलन्सची परिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी अनेक प्रवासी आणि क्रू सदस्य जखमी झाले होते.

  • २०२२ मध्ये रशियन निर्मित एमआय-२६ हेलिकॉप्टर या प्रदेशात कोसळले आणि या दुर्घटनेत १९ लोकांना आपला जीव गमवावा लागला होता.

तिबेट पठारावरून उड्डाण का शक्य नाही?

तिबेट पठाराची उंची: तिबेट पठारावरील हवा खूपच पातळ असते, ज्यामुळे विमानाच्या इंजिनच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. उंचीवर कमी झालेल्या ऑक्सिजनच्या पातळीमुळे इंजिनची कार्यक्षमता कमी होऊ शकते. आणि धोक्याची परिस्थिती उद्भवू शकते. जसं की इंजिनमध्ये बिघाड झाल्यास विमानाला अधिक ऑक्सिजनसह कमी उंचीवर लवकर लँड करावं लागतं. अशात ऑक्सिजन कमी असल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते.

तिबेट पठारावरील हवामान बदल: या परिसरात जोरदार वारे आणि हवामानात अचानक होणाऱ्या बदलांमुळे विमानाला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. या प्रदेशात गडगडाटी वादळाचा धोका असतो, जे विमानांसाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते. या हवामानामुळे वैमानिकांना सुरक्षितपणे योग्य दिशेची कल्पना न येऊन अपघाताची शक्यता असते.

तिबेट पठाराचा भूभाग: जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट तिबेट पठाराच्या सीमेवर आहे. अशा उंच भूभागावरून उड्डाण केल्याने आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ शकते. विमानाला इंजिनमध्ये अडचण किंवा इतर समस्या आल्यास, सुरक्षित लँडिंगसाठी मर्यादित पर्याय रहात नाहीत.

तिबेटच्या पठारावर हवाई वाहतूक नियंत्रण हे आणखी एक आव्हान आहे. हा प्रदेश विरळ लोकवस्तीचा आहे आणि तेथे कमी प्रमाणात विमानतळ आणि हवाई वाहतूक नियंत्रण सुविधा आहेत. यामुळे वैमानिकांना आपत्कालीन परिस्थितीत वेळेवर माहिती आणि मदत मिळणे कठीण होऊ शकते.

भौगोलिक राजकीय परिस्थितीदेखील एक महत्वाचं कारण आहे. कारण तिबेटी पठार हे राजकीयदृष्ट्या संवेदनशील भागात स्थित आहे. चीन, भारत आणि इतर अनेक देशांचे या प्रदेशात प्रादेशिक वाद आहेत, त्यामुळे विमानाचे नियोजन आणि राउटिंग क्लिष्ट होऊ शकते. कारण विमान कंपन्यांद्वारे एअरस्पेस नियम आणि निर्बंध नेव्हिगेट करणे आवश्यक आहे. राजकीय तणाव हवाई वाहतूक नियंत्रण सेवांच्या उपलब्धतेवर आणि प्रदेशावरील उड्डाणांसाठी इतर समर्थनांवरदेखील परिणाम करू शकतात.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा