tiger Team Lokshahi
ताज्या बातम्या

Tiger Attack| दाम्पत्यावर वाघाचा हल्ला; पत्नी ठार तर पती...

चंद्रपूर येथील चिमुर तालुक्यातील घटना

Published by : Shweta Shigvan-Kavankar

चंद्रपूर (अनिल ठाकरे) : तेंदू संकलनासाठी गेलेल्या पती-पत्नीवर वाघाने (Tiger) हल्ला केल्याची घटना घडली आहे. यामध्ये पत्नीचा मृत्यू झाला आहे तर पती अद्यापही बेपत्ता आहे. मीना जांभुळकर असे मृतक महिलेचे नाव आहे. व विकास जांभुळकर तिच्या नवऱ्याचे आहे. ही घटना चिमुर तालुका येथे घडली.

सध्या तेंदू हंगाम सुरु असल्याने जिल्ह्यातील चिमुर तालुक्यातील केवाडा येथील विकास जांभुळकर आणि त्यांचा पत्नी मीना तेंदू संकलनासाठी जंगलात गेले होते. यावेळी त्यांच्यावर अचानक वाघाने हल्ला चढविला. या हल्यात मीना जांभुळकर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर विकास जांभुळकर अद्यापही बेपत्ता आहेत. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून शोध घेत आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात वाघ-मानव संघर्षाने टोक गाठले आहे. वन्यजीवांचे हल्ले दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यात तेंदू हंगाम सुरू असल्याने तेंदुची पाने तोडायला मजूर मोठ्या प्रमाणात जंगलात जात आहेत. दरवर्षी तेंदू हंगामादरम्यान वाघाच्या हल्याच्या घटनेत मोठी वाढ होत असते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्यासाठी मनसे आणि शिवसेनेचे नेते वरळी येथील डोम सभागृहात दाखल

Sandeep Deshpande : 'आवाज मराठीचा!', विजयी मेळाव्यासाठी संदीप देशपांडेंचा खास टी-शर्ट; मराठीची मुळाक्षरेही दिसताहेत उठून

Maharashtra Rain Update : राज्यात पावसाचा जोर कायम; साताऱ्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Satara School : 'या' तालुक्यातील 334 शाळांना पावसाळी सुट्टी जाहीर