सध्या नवरा बायकोच्या नात्यात छोटी मोठी धूसपूस नव्हे तर मोठमोठी वादळं येण्याचं प्रमाण वाढल आहे. पूर्वीच्या काळाच्या तुलनेत आजची पिढी आपापसातील तणाव दूर करण्यापेक्षा नातं संपुष्टात आणणं जास्त सोईस्कर समजते. आता महिलाही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या त्या सक्षम असल्यामुळे त्यांना पुरुषांची किमान आर्थिकदृष्ट्या तरी आवश्यकता राहिलेली नाही. मात्र भावनिकतेचं काय... एकमेकांसोबत सुखी संसाराची स्वप्न पाहणारे ते दोघं नात्याला जरा तडा गेली की थेट विभक्त होण्याचा मार्ग पत्करतात, हे अगदी सर्रास पाहायला मिळते. परंतू थोडेफार कष्ट घेतल्यास तुमच्या नात्याला वेगळीच कलाटणी मिळू शकते. सध्या विभक्त होण्याच्या मार्गावर असलेल्या जोडप्यांना समुपदेशक काही बदल आपल्या जीवनात करण्यास आवर्जून सांगतात. हे बदल अंगिकारल्यास रिजर्ल्ट नक्कीच सकारात्मक मिळू शकतो.
हे करून बघा -
वाद किंवा मतभेद झाल्यास शांतपणे चर्चा करा आणि तोडगा काढण्याचा प्रयत्न करा.
एकमेकांशी मनमोकळी चर्चा करा, भावना व्यक्त करा आणि एकमेकांना ऐकण्याची तयारी ठेवा.
शंका किंवा गैरसमज दूर करण्यासाठी संवाद साधावा.
एकमेकांना वेळ देणे, भावनांचा आदर करणे आणि समस्यांवर बोलून तोडगा काढणे आवश्यक आहे.
व्यग्र जीवनातून एकमेकांना वेळ द्या, एकत्र काहीतरी करा आणि आनंदी क्षण अनुभवा.
एकमेकांच्या भावनांचा आदर करा, त्यांच्या मतांना महत्त्व द्या आणि त्यांच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.