ताज्या बातम्या

Mumbai : मुंबईत अल्पसंख्यांक मुलींसाठी नवीन अभियांत्रिकी महाविद्यालय उभारणार

मुंबई: अल्पसंख्यांक मुलींसाठी चेंबूरमध्ये नवीन अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना.

Published by : Team Lokshahi

मौजे अनिक, चेंबूर, अणुशक्ती नगर परिसरात अल्पसंख्यांक मुलींसाठी अभियांत्रिकी महाविद्यालय उभारण्याच्या अनुषंगाने आज मंत्रालयात एक उच्चस्तरीय बैठक झाली. क्रीडा, युवक व अल्पसंख्यांक व औकाफ मंत्रालय विभागाचे मंत्री मा. श्री. दत्तात्रय (मामा) भरणे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.

अल्पसंख्यांक, विशेषतः मुस्लीम समाजातील मुलींना उच्च शिक्षणाची संधी मिळावी यासाठी शासन कटिबद्ध आहे. शिक्षण हे समाज प्रगतीचे प्रमुख साधन असून, अल्पसंख्यांक विद्यार्थिनींना आधुनिक तंत्रज्ञान शिक्षण मिळवून देणे ही काळाची गरज आहे. यासाठी अणुशक्ती नगर येथे अभियांत्रिकी महाविद्यालय उभारण्याचा निर्णय घेतला असून, प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रमांतर्गत नियमानुसार प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मंत्री दत्तात्रय भरणे यांनी यावेळी दिले.

या महाविद्यालयात केवळ अल्पसंख्यांक नव्हे तर इतर समाजातील मुलींनाही प्रवेश मिळावा, आधुनिक साधनसामुग्री, प्रयोगशाळा, ग्रंथालय, वसतिगृह, इंटरनेट सुविधा यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध असाव्यात, यावर भर देण्यात आला. प्रस्ताव सादर करताना या सर्व बाबींचा समावेश असावा अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.

या बैठकीस आमदार सना मलिक, माजी मंत्री नवाब मलिक, अल्पसंख्यांक विभागाचे सचिव श्री. रूचेश जैवंशी, विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. गोविंद संगवई, सहसचिव श्री. संतोष खोरगडे, उपसचिव श्री. मिलिंद शेनॉय, कार्यकारी अभियंता श्री. संतोष कुलकर्णी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Asia Cup 2025 : भारत-पाकिस्तान सामन्याबाबतचा 'तो' सस्पेन्स संपला! ACC ने केली महत्त्वाची घोषणा

Dadar Kabutar khana : दादर कबुतरखान्यावर BMC ची ताडपत्री टाकत कारवाई; स्थानिक नागरिकांच्या विरोधामुळे कारवाई लांबणीवर

Latest Marathi News Update live : राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेचा उद्या मुंबईत मेळावा

Nashik Crime : नाशिकमध्ये बेंचवरून झालेला वाद जीवघेणा ठरला; विद्यार्थ्यांच्या हाणामारीत, एकाचा मृत्यू तर दोन विद्यार्थी....