आज अहमदाबाद येथील मेघानीनगर 12 जून रोजी दुपारी 1 वाजून 38 मिनिटांनी एअर इंडिया विमानाने उड्डाण घेतलं आणि टेकऑफनंतर अवघ्या 10 मिनिटातच विमानाचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात विमानामध्ये 10 क्रु मेंबर 2 लहान मुलांचा समावेश असल्याची माहिती DGCAकडून मिळाली आहे. विमान क्रॅश होण्याआधी वैमानिकाने आपत्कालीन संदेश पाठवला होता. अपघातग्रस्त विमानातून आतापर्यंत 100 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून विमानात 242 प्रवासी होते. सुचना मिळेपर्यंत अहमदाबाद एअरपोर्ट बंद राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. याचपार्श्वभूमीवर शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे. एअर इंडियाचे विमान कोसळला आहे.
नुकतचं ट्रम्प टॅरिफमुळे भारतीय बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली. तर आता विमान अपघातामुळे टाटासह इंडिगो आणि स्पाइसजेट या दोन बजेट एअरलाइन्सच्या शेअर्समध्ये शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. यादरम्यान बजेट एअरलाइन स्पाइसजेटच्या शेअर्समध्ये 2 टक्क्यांनी घसरण झाली. त्याचसोबत इंडिगोच्या शेअर्समध्ये 3.4 टक्क्यांनी घसरण झाली असून, इंडिगो शेअर्सला 5,437.50 सह सर्वात मोठा तोटा झाला आहे.
स्पाइसजेटचे शेअर्स 2.6 टक्क्यांनी घसरून 44.30 वर आले आहेत. त्याचसोबत याचा परिणाम इंडिगो आणि स्पाइसजेटच्या मार्केट कॅपवर देखील झाला आहे. इंडिगोचे शेअर बाजारात मार्केट कॅप 7,458.46 कोटी रुपयांनी कमी झाले. स्पाइसजेटचे मार्केट कॅप 152.55 कोटी रुपयांनी कमी झाले. त्यामुळे एअर इंडिया विमान अपघातामुळे दोन्ही कंपन्यांचे मार्केट कॅप हजारो कोटी रुपयांनी कमी झाले.