मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी समोर येत आहे. पश्चिम रेल्वेवर आज आणि उद्या 'जम्बो मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेने 24,25आणि 26 जानेवारीला'जम्बो मेगाब्लॉक घोषित केला आहे.
या तीन दिवसांमध्ये 300 हून जास्त लोकल सेवा रद्द करण्यात आल्याची माहिती मिळत असून माहीम आणि वांद्रे मार्गावरील स्थानकांदरम्यान पुलाच्या पुनर्बांधणीसाठी हा ‘जम्बो मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.
या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना आज पहाटेपासून त्रास सहन करावा लागत आहे. रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची गर्दी झाली आहे. मेगाब्लॉक दरम्यान पश्चिम रेल्वेवरील आज 150 उपनगरीय लोकल सेवा तर रविवारी रात्री 60 उपनगरीय सेवा रद्द केल्या जाणार असल्याची माहिती मिळत आहे.