बच्चू कडू 
ताज्या बातम्या

अमरावतीत आज प्रहारचा मेळावा, बच्चू कडूंच्या भूमिकेकडं साऱ्याचे लक्ष

अमरावतीत आज (1 नोव्हेंबर) आमदार बच्चू कडू यांच्या उपस्थितीत प्रहार संघटनेचा मेळावा होणार आहे.

Published by : Siddhi Naringrekar

अमरावतीत आज (1 नोव्हेंबर) आमदार बच्चू कडू यांच्या उपस्थितीत प्रहार संघटनेचा मेळावा होणार आहे. आमदार रवी राणा यांच्यासोबत झालेल्या वादाबाबत बच्चू कडू कोणती भूमिका घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. अपक्ष आमदार बच्चू कडू व आमदार रवी राणा यांच्या वादात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः उडी घेत काल त्यांच्या सरकारी वर्षा या निवस्थानी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन हे सुद्धा उपस्थित होते. रवी राणा आणि बच्चू कडू यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

आमदार रवी राणा यांनी आमदार बच्चू कडू यांच्यावर गुवाहाटीला जाऊन कोट्यवधी रुपये लाटल्याचा गंभीर आरोप केला होता. या आरोपानंतर बच्चू कडू आक्रमक झाले आहेत. तर पैसे घेतल्याचे रवी राणा यांनी पुरावे द्यावेत अन्यथा त्यांच्यावर मानहानीचा दावा दाखल करून असा इशारा बच्चू कडू यांनी दिला होता. यावरुन हा वाद सुरु झाला. मात्र आता शिंदे - फडणवीसांच्या मध्यस्थीनंतर रवी राणा - बच्चू कडू यांच्या वादावर पडदा पडला आहे. देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर राणा यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की, माझ्याकडून कोणी दुखावले गेले असल्यास मी दिलगीरी व्यक्त करतो. मी माझे शब्द मागे घेतो. माझ्यासाठी हा विषय इथेच संपला आहे. राज्याच्या हितासाठी आम्ही हा वाद मिटवला आहे. असे राणांनी म्हटले आहे. यासोबतच बच्चू कडू आणि मी नव्या सरकारचे घटक आहोत. आम्ही दोघेही सरकारसोबत आहोत. असे म्हटले होते.

याच पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बच्चू कडू म्हणाले की, आरोपांनंतर शांत राहिलो असतो तर बदनाम झालो असतो. माझी आज कार्यकर्त्यांसोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे. आज कार्यकर्त्यांसोबत चर्चा करणार आणि उद्या यावरची माझी भूमिका मी स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी सांगितले. एक नोव्हेंबरपर्यंत माझ्यावर केलेल्या आरोपाचे पुरावे सादर केले नाहीत तर आपण कोर्टात धाव घेणार असल्याचंही आमदार बच्चू कडू यांनी सांगितलं होतं. याच सर्व पार्श्वभूमीवर आज बच्चू कडू काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे. ज्या ठिकाणी मेळावा होणार आहे, त्या ठिकाणी 'मै झुकेगा नही' चे पोस्टर झळकले आहेत. त्यामुळं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा