अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज पाचवा दिवस असून राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर होणार आहे. आमदार अनिल परब यांनी केलेल्या वक्तव्यावर सत्ताधारी आक्रमक होण्याची शक्यता आहे.
यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज राज्यपालांच्या अभिभाषणावर उत्तर देणार आहेत. आज महिला दिनाच्या पूर्वसंध्येला विधीमंडळात महिलांच्या समस्यांवर देखील चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे.