मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काढण्यात आलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आझाद मैदानावरील आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे. मनोज जरांगेंच्या आंदोलनासाठी पोलिसांकडून अटींसह पुन्हा एक दिवसाची परवानगी देण्यात आली आहे. आंदोलक माघारी गेले तर आमदार-खासदारंचं फिरणं मुश्किल होईल'..'मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं', असा इशारा याठिकाणी जरांगे पाटील यांनी दिला आहे.
पोटजात, उपजात म्हणून आरक्षण द्या, तसेच सरसकट शब्दच वापरू नका, असा नवा सल्ला मनोज जरांगे यांनी सरकारला दिला. त्यामुळे जरांगेनच्या सल्ल्यावर सरकारची के भूमिका असेल ही बघणे महत्वाचे ठरणार आहे. त्याचसोबत आता एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आंदोलनाच्या चौथ्या दिवशी मनोज जरांगे यांची तब्येत खालावल्याचे पाहायला मिळत आहे.
मनोज जरांगे पाटील यांना अशक्तपणा आला आहे. त्यांना चालण्यासाठी देखील माणसांचा आधार घ्यावा लागत आहे. असं असताना आज पासून मनोज जरांगे पाणी सोडणार आहेत. त्यांनी घोषणा केली होती की, आजपासून म्हणजे 1 सप्टेंबरपासून ते आमरण उपोषण करणार आहेत, पाणी पिणे ही बंद करणार आहेत.
असं असताना त्यांचा शुगर फक्त 70 च्या आसपास असल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना जास्त पाणी पिण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे पाणी ही त्याग केलास त्यांची प्रकृती खालावू शकते असे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे सीएसएमटी परिसरातील जे.जे. फ्लाय ओव्हरवर नाकाबंदी करण्यात आली आहे. सीएसएमटी मुंबई महापालिका समोरील मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.