Maharashtra Election  Maharashtra Election
ताज्या बातम्या

Maharashtra Election : नगराध्यक्ष, नगर पंचायत, नगर परिषद निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे आजचा शेवटचा दिवस

राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींसाठीची निवडणूक येत्या 2 डिसेंबरला होणार असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत 17 नोव्हेंबर रोजी संपली.

Published by : Riddhi Vanne

(Maharashtra Election) राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींसाठीची निवडणूक येत्या 2 डिसेंबरला होणार असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत 17 नोव्हेंबर रोजी संपली. या निवडणुकीत एकूण 51 ,072 अर्ज दाखल झाले असून त्यापैकी नगराध्यक्षपदासाठी 4,197 अर्ज प्राप्त झाले आहेत. अर्ज मागे घेण्यासाठी 21 नोव्हेंबरपर्यंत वेळ दिली आहे. आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. छाननी प्रक्रिया 18 नोव्हेंबरला करण्यात आली असून विविध विभागांत वैध अर्जांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

कोणत्या विभागात किती अर्ज आले जाणून घेऊया...

छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वाधिक 11,811 अर्ज पात्र ठरले. बीड, धाराशीव, नांदेड, परभणी आदी जिल्ह्यांत मोठ्या संख्येने उमेदवारांनी अर्ज दाखल केले.

अमरावती विभागात एकूण 8,492 अर्ज वैध ठरले, तर कोकण विभागात पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मिळून 3,010 अर्ज छाननीतून पास झाले.

नागपूर विभागात भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि वर्धा मिळून 7,125 उमेदवारांचे अर्ज मंजूर झाले.

नाशिक विभागात 9,590 अर्ज पात्र ठरले, तर पुणे विभागात कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि पुणे मिळून 11,044 अर्ज वैध ठरले. राज्यभरात मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल झाल्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना चांगली उत्सुकता दिसत आहे.

थोडक्यात

  • राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींसाठीची निवडणूक येत्या 2 डिसेंबरला होणार आहेत.

  • उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत 17 नोव्हेंबर रोजी संपली.

  • या निवडणुकीत एकूण 51 ,072 अर्ज दाखल झाले असून त्यापैकी नगराध्यक्षपदासाठी 4,197 अर्ज प्राप्त झाले आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा