थोडक्यात
पुण्यात 27 तासांनंतरही विसर्जन मिरवणुका सुरुच
सकाळी 6 वाजल्यापासून डीजेचा दणदणाट पुन्हा सुरू
अजूनही शेकडो गणेश मंडळं लक्ष्मी रोडवर थांबून
पुण्यातील गणेश उत्सव विसर्जनाचा आज दुसरा दिवस असून पुण्यात 27 तासांनंतरही विसर्जन मिरवणुका सुरुच आहे. अजून अनेक मूर्ती विसर्जन होण्यास बाकी असल्यामुळे पुण्यात आता पुन्हा सकाळपासून डीजेचा दणदणाट सुरू झाला आहे. रात्री 12 नंतर डीजे बंद केल्याने अनेक वेळ मिरवणूक रेंगाळली होती. त्यानंतर सकाळी 6 वाजल्यापासून डीजेचा दणदणाट पुन्हा सुरू झाला. त्यामुळे अजूनही शेकडो गणेश मंडळं कुमठेकर, लक्ष्मी रोड आणि केळकर रोडवर थांबून आहेत. या सगळ्या विसर्जन मिरवणुकीसाठी पुणे पोलिसांनी तगड नियोजन केला आहे.