अमोल नांदूरकर, अकोला
सरपंच संतोष देशमुख यांची हत्या, परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरणाच्या निषेधार्थ आज अकोल्यात जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.
या दोन्ही प्रकरणात दोषी असणाऱ्या कुणाचीही गय न करता संबंधित दोषीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली जाणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व व प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शन वैभवी संतोष देशमुख, आमदार सुरेश धस, मनोज जरांगे करणार आहेत.
आक्रोश मोर्चाला दुपारी 2 वाजता सुरुवात होणार आहे. याठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करणार आहेत. मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहणार आहेत.