Raj Thackeray MNS Pune aandolan Team Lokshahi
ताज्या बातम्या

पाकिस्तान जिंदाबादला मनसे देणार 'हर हर महादेव' ने उत्तर

'ही कीड समूळ नष्टच करा' असं आवाहन राज ठाकरेंनी केंद्रीय व राज्याचे गृहमंत्री यांना केलं

Published by : Vikrant Shinde

चंद्रशेखर भांगे | पुणे: काल पुण्यामध्ये PFI (Popular Front of India) च्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पाकिस्तान जिंदाबाद, अल्लाहू अकबर अश्या घोषणा दिल्या. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर सर्व राजकीय पक्षांकडून प्रतिक्रिया आल्या. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल एक ट्वीट करून संतप्त प्रतिक्रिया दिली. 'ही कीड समूळ नष्टच करा' असं आवाहन त्यांनी केंद्रीय व राज्याचे गृहमंत्री यांना केलं. त्यानंतर आता मनसे चांगलीच आक्रमक झाली आहे.

पुण्यात आज मनसेचं आंदोलन:

इस्लामिक दहशवाद्यांकडून पुणे गड बनवला गेला आहे असं चित्र काल-परवाच्या घटनेनं निर्माण झालं असल्याचा मनसेचा दावा आहे. इथे जर इस्लामिक मूलतत्ववादी "पाकिस्तान जिंदाबाद " च्या घोषणा देत असतील राजसाहेब ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार देश रक्षणार्थ "हर हर महादेव" च्या घोषणा देऊन निदर्शन करणार असल्याचे मनसे कडून जाहीर करण्यात आलं आहे. याबाबत मनसे प्रदेश सरचिटणीस अजय शिंदे यांनी माहिती दिली आहे.

रविवार (२५ सप्टेंबर) दुपारी १ वाजता टिळक चौक (अलका टॉकीज चौक ) येथे मनसे आंदोलन करणार. असं पुणे मनसेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

राज ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया:

"एनआयएने छापे घातले आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) च्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना अटक केली, म्हणून पुण्यात ह्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी, 'पाकिस्तान झिंदाबाद, अल्लाहू अकबर' अशा घोषणा दिल्या. सरकारने ह्यांना वेळीच ठेचलं पाहिजे.

ही अटक कशासाठी झाली? तर दहशतवाद्यांना आर्थिक मदत करणे, त्यांची प्रशिक्षण शिबिरं आयोजित करणे. हा गंभीर आरोपांखाली... थोडक्यात देशद्रोही कृत्यांसाठी. तरीही ह्या देशद्रोह्यांचं समर्थन करत जर ह्या PFI च्या कार्यकर्त्यांना त्यांचा धर्म आणि पाकिस्तान आठवत असेल, तर तुमचा धर्म घ्या आणि पाकिस्तानात चालते व्हा. ही थेरं आमच्या देशांत चालणार नाहीत.

माझी केंद्रातील आणि राज्यातील गृहमंत्र्यांना विनंती आहे की फक्त ह्या देशद्रोह्यांनाच नव्हे। तर त्यांच्या ह्या समर्थकांना पण अशी अद्दल घडवा की यापुढे पाण्यासाठी देखील ( पा)। उच्चारता येणार नाही!

नाहीतर आता ह्या देशातील हिंदू बांधव गप्प बसणार नाहीत. हिंदुस्थानातील हिंदूंच्या। आणि महाराष्ट्रातील हिंदू मरहठ्यांच्या मुठी जर आवळल्या तर ह्या हरामखोरांना कुठे पाय लावन पळायला लागेल हे मला सांगायला लावू नका. ह्या सगळ्याने उगाचच सणासुदीच्या काळात अशांतता पसरेल.

त्यापेक्षा ही कीड समूळ नष्टच करा, ह्यातच हिंदुस्थानाचं हित आहे."

अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी ट्वीट करून दिली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ganeshotsav 2025 Toll-Free Passes: बाप्पाचा आर्शिवाद! कोकण प्रवासासाठी विशेष पास कसा मिळवायचा? जाणून घ्या...

Gold Rate Today : देशभरात सोने-चांदीच्या किमतींतील घसरणीला ब्रेक; तुमच्या शहरातील दर जाणून घ्या

Anjali Damania On Dhananjay Munde : 'ती' फाईल गायब केली' दमानियांचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल

Devendra Fadnavis Called Sharad pawar And Uddhav Thackeray : "आम्हाला तुमच्याही पाठिंब्याची गरज" फडणवीसांची थेट पवार आणि ठाकरेंना फोनवर विनंती; राजकीय वर्तुळात भूकंप