आज लोकल रेल्वेने प्रवास करणाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आज मध्य आणि ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्ययात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर, तर ठाणे-वाशी नेरूळ अप आणि डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. आज सकाळी 11 वाजून 10 मिनिटांपासून ते दुपारी 4 वाजून 10 मिनिटांपर्यंत ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल सेवा पूर्णपणे बंद राहणार आहे.
त्यामुळे ज्यांना आज प्रवास करायचा असेल तर वेळेचे नियोजन आधी करावे. तसेच सर्व लोकलच्या अपडेट्सकडे लक्ष द्यावे.