राष्ट्रीय महामार्गांवर लवकरच टोलच्या किमती कमी होणार असल्याची माहिती मिळत असून याबाबत सरकार लवकरच नवीन धोरण जाहीर करणार आहे. केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी लवकरच सरकारतर्फे नवं टोल धोरण आणलं जाणार असल्याचं जाहीर केलं आहे.
नव्या टोल धोरणानुसार 3 हजार रुपये वार्षिक तर 30 हजार रुपये 15 वर्षांसाठी अशा प्रकारे दर आकारणी करण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. यासाठी एकदाच पेमेंट करावं लागणार आहे. यातच आता राष्ट्रीय महामार्गांवरील टोलसाठी केंद्र सरकार लवकरच नवं धोरण आणणार आहे.
यासोबतच टोल प्लाझा काढण्यात येणार असून सॅटेलाइटवर आधारित बॅरियर फ्री टोल व्यवस्था नव्या धोरणानुसार लागू करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. यामुळे सॅटेलाइट टोल प्रणालीमुळे बँकेच्या खात्यातून आपोआप टोल कापला जाणार असल्याचे समजते.