Chaityabhumi  Team Lokshahi
ताज्या बातम्या

उद्या होणार डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्कीटचे उद्घाटन

पर्यटकांसाठी 3, 4, 7 आणि 8 डिसेंबर रोजी मुंबई टूर सर्किटची मोफत सफर

Published by : Sagar Pradhan

26 नोव्हेंबर हा संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने दि. 26 नोव्हेंबर, 2022 रोजी पर्यटन संचालनालयाने नव्याने तयार केलेल्या ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्कीट’ चे उदघाटन हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा, पर्यटन सचिव सौरभ विजय आणि पर्यटन संचालक डॉ बी. एन. पाटील यांच्या उपस्थितीत सांय. ५.00 वा. चेंबूर, दि फाईन आर्टस सोसायटी येथे संपन्न् होणार आहे. त्याच प्रमाणे मुंबई, कोकण, नाशिक, आणि नागपूर येथे केलेल्या ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्कीट’ चे उद्घाटन समारंभाचे थेट प्रक्षेपण दादर येथील चैत्यभूमी, महाड येथील चवदारतळे, नाशिक येथील काळाराम मंदिर व नागपूर येथील दीक्षाभूमी कडून त्याच सुमारास करण्यात येणार आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हयांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यातून तसेच परराज्यातून चैत्यभूमी दादर येथे मोठया संख्येने अनुयायी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस्थळाला अभिवा‍‌दन करण्यासाठी दरवर्षी भेट देत असतात. तरी त्यांच्या जीवनाशी निगडीत स्थळे तसेच बौध्द लेणी यांचे दर्शन घडविण्यासाठी हा सर्कीट बनवण्यात आले आहे.

भीमराव रामजी आंबेडकर हयांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्यप्रदेशातील महू येथे झाला. डिसेंबर 1904 रोजी ते मुंबईत आले. बाबासाहेब १९१२ साली मुंबईतील एलफिस्टन हायस्कुलमधून पदवीधर झाले. भारतात परतल्यानंतर बाबासाहेबांनी जाती भेदाला विरोध केला तसेच अस्पृश्य लोकांकरिता सामाजिक हक्क मिळवून देण्यासाठी चळवळ सुरु केली.

पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा म्हाणाले, “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडीत मुंबईतील महत्त्वाची स्थळे व बौध्द लेणीवर आधारीत टूर सर्कीट तयार करण्यात आले असून दिनांक 3 व 4 डिसेंबर आणि 7 व 8 डिसेंबर 2022 रोजी आयोजित टूरमध्ये चैत्यभुमी, राजगृह, डॉ. बाबसाहेब आंबेडकर भवन, बीआयटी चाळ व डॉ. बाबसाहेब आंबेडकर महाविद्यालय, वडाळा या स्थळांचा समाविष्ट आहे. सदर टूर ची बुकिंग ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही पध्दतीने पर्यटकासाठी भविष्यात उपलब्ध् करण्यात येत आहे.”

पर्यटन सचिव सौरभ विजय म्हणाले, “पर्यटन संचालनालयाद्वारे व बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या सहकार्याने दि.6 डिसेंबर, 2022 रोजी दादर चैत्यभूमी येथे स्टॉल उभारुन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्कीटची प्रसिध्दी व प्रचालन करण्याचे प्रस्तावित आहे. सदर टूर सर्कीट हे पर्यटन संचालनालय मुंबई टूर गाईड असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने निशुल्क व महाराष्ट्रा मधील मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद या सहा जिल्हयात पर्यटकांसाठी राबविण्यात येणार आहे.”

पर्यटन संचालनालय बद्दल:

महाराष्ट्र टूरिझमची प्रमुख संस्था राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध पर्यटन योजना, जाहिराती आणि प्रसिद्धी सादर करणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे पाहते. महाराष्ट्र सरकारच्या पर्यटन संचालनालयाच्या स्थापनेपासून, राज्याने अनेक टप्पे गाठले आहेत आणि विविध उपक्रमांच्या मदतीने अनेक सिद्धी मिळवल्या आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ankita Lokhande and Vicky Jain: अंकिता लोखंडेच्या पती विकी जैनला अपघात; हातात काचांचे तुकडे रुतले, तब्बल 45 टाके

Latest Marathi News Update live : छ.संभाजी महाराजांच्या 100 फुटी पुतळ्याची उभारणी

Jayant Patil : राष्ट्रवादीच्या शिबिरात जयंत पाटीलांची ठाम भूमिका; भारत-पाकिस्तान क्रिकेटवर आक्षेप

Sanjay Raut On Ajit Pawar : अजित पवारांवर संजय राऊतांचा घणाघात; भारत-पाक सामना प्रकरणावरून चांगलीच जुंपली