ताज्या बातम्या

Today’s Top Breaking News : आज दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी, जाणून घ्या…

Indian Politics News: आज दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या पाच घडामोडींचा सविस्तर आढावा. राजकारण, अर्थकारण, क्रीडा आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील ताज्या बातम्या एका क्लिकवर जाणून घ्या.

Published by : Varsha Bhasmare
Voting Percentage In Maharashtra

(Zilla Parishad Election) राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी काल मतदान पार पडलं. उद्या सोमवारी 9 तारखेला मतमोजणी पार पडणार असून निकाल लागणार आहे. काल सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 या वेळेत मतदान पार पडलं. यासोबतच उद्या 9 तारखेला सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरूवात होणार आहे.

Mohan Bhagwat

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भारताच्या जागतिक भूमिकेबाबत महत्त्वपूर्ण आणि दूरदृष्टीपूर्ण भूमिका मांडली आहे. भारताने केवळ “महाशक्ती” होण्याच्या शर्यतीत अडकू नये, तर “विश्वगुरू” म्हणून जगाला मार्गदर्शन करणारी भूमिका वठवावी, असा सल्ला त्यांनी केंद्र सरकारला दिला आहे. आंतरराष्ट्रीय राजकारण, व्यापार करार आणि जागतिक दबाव यावर भाष्य करताना भागवत यांनी भारताने आपल्या मूल्यांवर आधारित स्वतंत्र धोरण ठेवावे, असे ठामपणे सांगितले.

देशातील सर्वाधिक वापरात असलेली डिजिटल पेमेंट प्रणाली असलेल्या युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) संदर्भात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. वाढत्या डिजिटल व्यवहारांचा ताण, सायबर फसवणुकीच्या घटना आणि भविष्यातील गरजा लक्षात घेता UPI च्या तांत्रिक पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी याबाबत माहिती देताना UPI इकोसिस्टम अधिक मजबूत, सुरक्षित आणि शाश्वत बनवण्यावर भर दिला आहे.

8th Pay Commission

देशभरातील लाखो केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने बहुप्रतिक्षित ८ व्या केंद्रीय वेतन आयोगाची (8th Pay Commission) अधिकृत वेबसाइट सुरू केली असून, यामुळे वेतन निश्चिती प्रक्रियेत पारदर्शकता, सहभाग आणि डिजिटल सुलभता वाढणार आहे. या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना थेट आपले मत, मागण्या आणि सूचना सरकारपर्यंत पोहोचवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.

मुंबईसह देशातील विविध भागांमध्ये हवामानात लक्षणीय बदल होताना दिसत आहेत. जानेवारी महिन्यात उत्तर भारतात तीव्र थंडीची लाट जाणवत होती. दिल्ली, पंजाब, हरियाणा, राजस्थानसह अनेक भागांत कडाक्याची थंडी पडली होती, तर हिमालयीन परिसरात मोठ्या प्रमाणावर हिमवृष्टी झाली होती. मात्र, फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच या परिस्थितीत बदल झाला असून आता उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. राजधानी दिल्ली, आर्थिक राजधानी मुंबई तसेच मध्य भारतातील अनेक भागांमध्ये तापमान झपाट्याने वाढताना दिसत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा