New Year Party New Year Party
ताज्या बातम्या

New Year Party : कोकण किनाऱ्यावर नववर्षाचा रंगीन जल्लोष, निसर्ग आणि उत्सवाचा संगम

स्वच्छ समुद्रकिनारे, हिरवळ, शांत वातावरण, तुलनेने कमी गर्दी आणि बजेटमध्ये बसणारा खर्च यामुळे कोकण पर्यटनासाठी अधिक आकर्षक ठरत आहे.

Published by : Riddhi Vanne

जुने वर्ष निरोप देऊन नव्या वर्षाचे आनंदात स्वागत करण्यासाठी यंदा अनेक पर्यटकांनी गोव्याऐवजी कोकण किनारपट्टीची निवड केल्याचे दिसून येत आहे. स्वच्छ समुद्रकिनारे, हिरवळ, शांत वातावरण, तुलनेने कमी गर्दी आणि बजेटमध्ये बसणारा खर्च यामुळे कोकण पर्यटनासाठी अधिक आकर्षक ठरत आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर यांसारख्या शहरांतून मोठ्या प्रमाणावर पर्यटक कोकणाकडे रवाना झाले आहेत. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यांतील समुद्रकिनारे, किल्ले, मंदिरे आणि निसर्गरम्य ठिकाणे पर्यटकांना विशेष भावत आहेत.

गणपतीपुळे, भाटये, मांडवी, गुहागर, हर्णे, मुरूड, वेळणेश्वर, आरे-वारे, देवबाग, तारकर्ली, मालवण, निवती, काशिद आणि अलिबाग या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. नववर्ष साजरे करण्यासाठी अनेकांनी कुटुंबीय आणि मित्रांसह होमस्टे, रिसॉर्ट्स व हॉटेल्सची आधीच नोंदणी केली असल्याचे पर्यटन व्यवसायिकांनी सांगितले.

कोकणातील खास स्थानिक जेवण, विशेषतः मासळीचे पदार्थ, घरगुती चव, नारळ आणि कोकमावर आधारित पदार्थ यांना पर्यटकांची विशेष पसंती मिळत आहे. यासोबतच बोटिंग, जलक्रीडा, स्कुबा डायव्हिंग आणि स्नॉर्कलिंगसारख्या उपक्रमांमुळे पर्यटनाला अधिक चालना मिळत आहे. काही ठिकाणी नववर्षाच्या स्वागतासाठी सांस्कृतिक कार्यक्रम, संगीताचे कार्यक्रम आणि पारंपरिक कोकणी उत्सवांचे आयोजनही करण्यात आले आहे.

पर्यटकांची संख्या वाढल्याने स्थानिक व्यवसायांना चांगला फायदा होत असून हॉटेल व्यावसायिक, होमस्टे चालक, वाहनचालक, मार्गदर्शक आणि स्थानिक विक्रेत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मात्र वाढती गर्दी लक्षात घेऊन प्रशासनाने वाहतूक व्यवस्था, सुरक्षा आणि स्वच्छतेबाबत दक्ष राहण्याचे आवाहन केले आहे. समुद्रकिनाऱ्यांवर सुरक्षेसाठी लाइफगार्ड तैनात करण्यात आले असून पर्यटकांना नियम पाळण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. शांतता, निसर्ग आणि स्थानिक संस्कृतीचा अनुभव घेण्यासाठी कोकण हा गोव्यानंतर नववर्षासाठी पर्यटकांचा आवडता पर्याय ठरत आहे.

दरम्यान, गुहागर येथे ‘थर्टी फर्स्ट’च्या स्वागतासाठी पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गुहागर पोलीस, अन्न व औषध प्रशासन आणि सागरी सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. पर्यटकांच्या वाहनांसाठी पोलीस परेड मैदानात पार्किंगची सोय करण्यात आली आहे. गुहागर नगरपंचायत प्रशासनही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. २५ डिसेंबरपासून नाताळ साजरा होत असून, 31 डिसेंबरच्या रात्री जुने वर्ष निरोप देत 2026 या नव्या वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी पर्यटक रात्रभर आनंद साजरा करणार आहेत.

थोडक्यात

जुन्या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी यंदा अनेक पर्यटकांनी कोकण किनारपट्टीची निवड केली.


स्वच्छ समुद्रकिनारे, हिरवळ, शांत वातावरण, कमी गर्दी आणि बजेटमध्ये बसणारा खर्च कोकणाचे आकर्षण वाढवत आहे.


मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर यांसारख्या शहरांतून पर्यटक मोठ्या प्रमाणावर कोकणाकडे रवाना


रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यांतील समुद्रकिनारे, किल्ले, मंदिरे आणि निसर्गरम्य ठिकाणे पर्यटकांना भावत आहेत.


पर्यटन व्यवसायासाठी कोकण किनारपट्टीला यंदा भरघोस संधी


ट्रॅफिक आणि गर्दी टाळण्यासाठी पर्यटकांनी पूर्वतयारी केली असल्याचे दिसून येत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा