ताज्या बातम्या

Pahalgam Terror Attack : 'त्या' पर्यटकांना परतीची आस; प्रशासनाकडे केली 'ही' विनंती

काही पर्यटक अजूनही तिथे अडकून पडले आहेत. त्यातील काही पर्यटकांनी शासनाकडे तिथून परतण्यासाठी मदतीची विनंती केली आहे.

Published by : Rashmi Mane

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 28 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर काही लोकं जखमी झाले आहेत. सध्या ऊन्हाळ्याच्या सुट्टीचा काळ सुरू असल्याने देशभरातील पर्यटक देशातील थंड हवेच्या ठिकाणी भटकंतीसाठी केले आहेत. त्यातच काश्मीरमध्ये जाणाऱ्या पर्यटकांची संख्या जास्त आहे. या भ्याड हल्ल्यात मृत पावलेल्यांमध्ये महाराष्ट्रातील 6 नागरिकांचा समावेश आहे. तर काही पर्यटक अजूनही तिथे अडकून पडले आहेत. त्यातील काही पर्यटकांनी शासनाकडे तिथून परतण्यासाठी मदतीची विनंती केली आहे.

जळगावच्या चाळीसगावमधील 14 पर्यटक काश्मीरमध्ये अडकेल असून त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून त्यांची स्थिती व्यक्त केली आहे. देवयानी ठाकरे यांनी व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, "आम्ही सुरक्षित आहोत. मात्र हल्ल्यामुळे खूप घाबरलो आहोत. काश्मीरमधून लवकर निघण्याचा प्रयत्न सुरू आहे. इथे आम्ही 14 लोकं आहोत. आता जरी सुरक्षित असलो तरी इथे हाय अलर्ट जारी आहे. त्यामुळे सरकारला विनंती आहे की, लवकरात लवकर सगळ्याच पर्यटकांची इथून सुटका करावी. दरम्यान, माझं माझ्या मतदारसंघातील खासदार, आमदारांशी संपर्क झाला असून ते सतत आम्हाला धीर देत आहेत. इथलं वातावरण अतिशय गंभीर आहे. तरी प्रशासनाला विनंती आहे की, सर्वांना लवकरात लवकर बाहेर नेण्याची व्यवस्था करावी."

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Beed Rain : बीडमध्ये पावसाचा हाहाकार! सहा गावांमध्ये 44 जण अडकले, बचाव मोहिमेसाठी...

Asia Cup 2025 IND vs PAK : हस्तांदोलन वादावरून पाकिस्तानचा संताप उफाळला! आयसीसीसमोर ठेवले अल्टिमेटम

Beed Govind Barge : माजी उपसरपंच आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट! नर्तिका पूजा गायकवाडला गायकवाडला न्यायालयीन कोठडी

Google Gemini News Trend : गुगल जेमिनी काय ऐकत नाही! रेट्रो-थ्रीडी मॉडेल फोटोनंतर जेमिनी घेऊन आलं नवा ट्रेंड