मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाची पुन्हा हाक दिली आहे. जरांगेची तोफ पुन्हा मुंबईकडे रवाना होत आहे. येत्या 29 ऑगस्टला आझाद मैदानावर मनोज जरांगे उपोषणाला सुरुवात करणार आहेत. गणपती सणासुदीच्या काळात मनोज जरांगे आंदोलन करणार आहेत. काल म्हणजे 27 ऑगस्टला जरांगे त्यांच्या कुटुंबायांना भेटून मुंबईकडे निघाले आहेत. त्यासाठी मनोज जरांगे आपल्या समर्थकांसह नवी मुंबईच्या दिशेने मुंबई आझाद मैदान येथे रवाना होणार आहेत. यापार्श्वभूमीवर नवी मुंबई वाहतूक विभागातर्फे वाहतुकीमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. वाहतूक उपयुक्त तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली केलेके बदल पुढीलप्रमाणे केले आहेत. त्यामध्ये आज दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन असल्याने कोणताही अनूचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिसांनी कडक सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.
(New Panvel ) नवीन पनवेल वाहतूक विभाग
प्रवेशबंदी: मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरुन कोनफाटाकडे येणारी सर्व प्रकारचे वाहनांना प्रवेश बंदी करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग (हलकी व दुचाकी वाहने): मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरुन कोनफाटाकडे येणारी वाहने मुंबई पुणे एक्सप्रेस वे उतरुन कामोठे, सायन-पनवेल महामार्ग येथुन इच्छित स्थळी जातील.
प्रवेशबंदी - मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरुन बोर्ले टोल नाक्याकडे येणा-या सर्व प्रकारचे वाहनांना बोर्ले टोल नाका येथून पळस्पेकडे प्रवेश बंदी करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग (हलकी व दुचाकी वाहने):- मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरुन बोर्ले टोल नाक्याकडे येणारी वाहने खालापुर व खोपोली मार्गे इच्छित स्थळी जातील.
प्रवेशबंदी : खालापुर रसायनी कडून दांडफाटा मार्गे शेंडुग कडे येणारी सर्व प्रकारचे वाहनांना पळस्पेकडे येण्यास प्रवेश बंदी करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग (हलकी व दुचाकी वाहने):- खालापुर रसायनी कडून दांडफाटा मार्गे शेंडग कडे येणारी वाहने मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरुन कळंबोली ब्रीज मार्गे, सायन-पनवेल महामार्ग मार्ग इच्छित स्थळी जातील,
प्रवेशबंदी - गोवामार्गे मुंबई, नवी मुंबईकडे व जेएनपीटीकडे येणारे सर्व प्रकारचे वाहनांना पळस्पे सर्कल येथुन जेएनपीटी मार्गावर जाणेकरीता प्रवेश बंदी करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग (हलकी व दुचाकी वाहने):- गोवामार्गे मुंबई व नवी मुंबईकडे येणारे वाहनांना खारपाडा येथुन डावीकडे साईगाव, दिघोडेगाव, चिरनेर मार्गे इच्छित स्थळी जातील. तसेच नवी मुंबई व मुंबईचे दिशेने जाणारी वाहने पनवेल शहर, कळंबोली मागनि इच्छीत स्थळी जातील
( Panvel) पनवेल शहर वाहतूक विभाग
प्रवेशबंदी - मार्ग कळंबोली सर्कल, करजाडे, पनवेल शहर येथुन जेएनपीटीकडे जाणारे सर्व प्रकारचे वाहनांना डि पॉईट पासून प्रवेश बंदी करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग (हलकी व दुचाकी वाहने): कळंबोली सर्कल, फरजाडे, पनवेल शहर येथुन जेएनपीटीकडे जाणारे वाहने कळंबोली सर्कल सायन-पनवेल महामार्ग, उरण फाटा मार्गाने इच्छित स्थळी जातील.
(Gavanphata) गव्हाणफाटा वाहतूक विभाग
प्रवेशबंदी- जेएनपीटी एनएच-४ वी वरुन तसेच गव्हाणफाटा येथुन किल्ला जंक्शन कडे येणारे सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग (हलकी व दुचाकी वाहने):- जेएनपीटी एनएच-४ वी वरुन तसेच गवकाणफाटा येथुन किल्ला जंक्शन कडे येणारे सर्व प्रकारची वाहने गव्हाणफाटा येथुन एनएच-३८८अं मार्गे सायन-पनवेल महामार्गावरुन कळंचोली सर्कल मार्गे इच्छित स्थळी जातील.
( Seawood) सीवुड वाहतूक विभाग
प्रवेशबंदी - किल्ला जंक्शन (एनआरआय), सीवूड सेक्टर नं. ५० सिग्नल, अक्षर सिग्नल, टी.एस. चाणक्य सिग्नल, वजराणी सिग्नल, सारसोळे सिग्नल, मोराज सर्कल येथुन पामबिच मार्गावरुन जाणा-या सर्व वाहनांना वाशी, कोपरी, एपीएमसी तसेच मुंबई, ठाणे फडे जाण्यास प्रवेशबंदी करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग (हलकी व दुचाकी वाहने):- किल्ला जंक्शन (एनआरआय), सीवूड सेक्टर नं. ५० सिग्नल, अक्षर सिग्नल, टी.एस. चाणक्य सिग्नल, बजराणी सिग्नल, सारसोळे सिग्नल, मोराज सर्कल येथुन पामविच मार्गावरुन जाणारी सर्व वाहने ही वाशी, कोपरी, एपीएमसी येथे पामबीच वरुन न जाता नवी मुंबई शहरातील अंतर्गत मार्गाने इच्छित स्थळी जातील.
(CBD ) सीबीडी वाहतूक विभाग
प्रवेश बंदीः- सीबीडी सर्कल येथुन सेक्टर १५ मधुन किल्ला जंक्शन येथुन पामविचकडे व मुंबई, ठाणेकडे तसेच वाशी, कोपरी, एपीएमसी कडे जाणा-या सर्व वाहनांना किल्ला जंक्शन येथुन पामबिच रोडने जाण्यास प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग (हलकी व दुचाकी वाहने):- सीबीडी सर्कल येथुन किल्ला जंक्शन मार्गे पामविचकडे व मुंबई, ठाणेकडे तसेच वाशी, कोपरी, एपीएमसी कडे जाणारी सर्व वाहने पामबीच वरुन न जाता आम्र मार्ग, ठाणे-सायन पनवेल मार्गे जातील.
( Vashi) वाशी वाहतूक विभाग
प्रवेश बंदी वाशी प्लाझा येथुन वाशी रेल्वे स्टेशनकडे जाणा-या सर्व प्रकारचे वाहनांना प्रवेश बंदी करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग (हलकी व दुचाकी वाहने):- वाशी प्लाझा ते वाशी रेल्वे स्टेशन कडे जाणे करीता सायन-पनवेल मार्गे सानपाडा रेल्वे स्टेशन जवळील सव्र्व्हस रोडने वाशी रेल्वे स्टेशन कडे जातील.