ताज्या बातम्या

Pune : वाहतूक पोलीस धनाजी वणवे यांचे ड्युटीदरम्यान हृदयविकाराने निधन

धनाजी वणवे यांच्या निधनाने पोलीस दलाच्या आरोग्यविषयक आव्हानांवर प्रश्नचिन्ह

Published by : Team Lokshahi

पुणे शहरातून एक अत्यंत दु:खद आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. वाहतूक पोलीस धनाजी भरत वणवे यांचे बुधवारी सायंकाळी ड्युटीवर असताना अचानक हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. धनाजी वणवे हे सायंकाळी सुमारे पावणे सातच्या सुमारास कात्रज चौकाजवळ मंडई परिसरात वाहतूक नियंत्रणाच्या ड्युटीवर होते. त्याच दरम्यान त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि काही क्षणातच ते जमिनीवर कोसळले. आजूबाजूच्या सहकाऱ्यांनी तात्काळ त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना दाखल केल्यानंतर मृत घोषित केले.

वणवे हे त्यांच्या प्रामाणिक आणि निःस्वार्थ सेवेसाठी ओळखले जायचे. ते पोलीस नाईक पदावर कार्यरत होते. सर्व सहकाऱ्यांशी सदैव मनमोकळेपणाने वागणारे, कामाबाबत काटेकोर आणि शिस्तप्रिय म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने संपूर्ण पोलीस दलात शोककळा पसरली आहे.

या दु:खद घटनेनंतर वणवे यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. पोलिसांवर ताणतणावाचे कामकाज असते. कामचा ताण हा त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करत असतो. वणवे यांचे निधन ही बाब पुन्हा एकदा पोलीस दलाच्या आरोग्यविषयक आव्हानांकडे लक्ष वेधणारी आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Accident : नाशिक मुंबई महामार्गावर भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू

Latest Marathi News Update live : बच्चू कडू यांच्या 'सात बारा कोरा' यात्रेचा आज पाचवा दिवस

Latest Marathi News Update live : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आनंदाश्रमात दाखल

आजचा सुविचार