KDMC | Traffic police  team lokshahi
ताज्या बातम्या

कल्याण डोंबिवलीत खड्डे बुजवण्यासाठी वाहतूक पोलिस रस्त्यावर

केडीएमसीचे काम अजूनही संथ गतीने

Published by : Shubham Tate

कल्याण (अमजद खान) - कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाने खड्डे बुजवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असल्याचा दावा केला आहे. मात्र शहारातील रस्त्यावरील खड्डे पाहता हा दावा आता संशोधनाचा विषय ठरला आहे. शहरातून जाणाऱ्या एमएसआरडीसी पीडब्ल्यूडी अंतर्गत असलेल्या रस्त्यावर देखील खड्ड्यांचे साम्राज्य दिसून येत आहे. एकंदरीतच संबधित यंत्रणांकडून खड्डे बुजवण्याचे काम संथ गतीने सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येतोय. (Traffic police on road to fill potholes in Kalyan Dombivli)

नागरिक खड्डे आणि त्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे त्रस्त आहेत. तर दुसरीकडे वाहतूक पोलिसांची वाहतूक कोंडी सोडवता सोडवता दमछाक होतेय. त्यामुळे आता कल्याण डोंबिवली शहरात वाहतूक पोलिसांनी खड्डे बुजवण्यासाठी पुढाकार घेतल्याचे दिसून येत आहे.

डोंबिवली पूर्वकडील टिळक चौक ते शेलार नाक्यापर्यत पडलेले खड्डे बुजवन्यासाठी पुन्हा वाहतूक पोलीसच सरसवल्याचे आज दिसून आले. वाहतूक व्यवस्थेबरोबर रस्त्यावर अपघात होऊ नये याकरता वाहतूक पोलिसांनी रस्त्यावर खडी टाकून तात्पुरत्या स्वरूपात खड्डे बुजवून वाहनचालकांना थोडा का होईना पण दिलासा देत प्रशासनाला शिकवण दिली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात

Jalgaon Accident : आयशर वाहनाची एसटी बसला जोरदार धडक; बसचे मोठे नुकसान, 1 जणाचा मृत्यू, 25 प्रवासी जखमी