ताज्या बातम्या

Traffic Rules : वाहतुकीचे नियम मोडल्यास चालकाला मिळणार निगेटिव्ह पॉईंट्स; ड्रायव्हिंग लायसन्स पण होणार रद्द; जाणून घ्या कसं

वाहतूक नियमांच्या उल्लंघनावर नियंत्रण आणण्यासाठी अनोखी शक्कल लढवण्यात आली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

वाहतूक नियमांच्या उल्लंघनावर नियंत्रण आणण्यासाठी अनोखी शक्कल लढवण्यात आली आहे. वाहतुकीचे नियम तोडले तर चालकाला आता निगेटिव्ह पॉईंट्स मिळणार असून ड्रायव्हिंग लायसनमध्ये निगेटिव्ह पॉईंट सिस्टिम सुरू करण्याची योजना आखली आहे.

वाहतूक परवान्यात नकारात्मक गुण प्रणाली सुरू करण्यात येणार आहे. वाहन चालकांना शिस्त लागावी यासाठी अनेक उपाय करण्यात आले आहेत. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ड्रायव्हिंग लायसनमध्ये निगेटिव्ह पॉईंट सिस्टिम सुरू करण्याची योजना आखली आहे.

जेव्हा हे निगेटिव्ह गुण निश्चित केलेल्या गुणांपेक्षा जास्त होतील तेव्हा ड्रायव्हिंग लायसन रद्द करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. रस्ते वाहतुकीची सुरक्षा वाढवण्यासाठी आणि वाहतुकीच्या नियमांच्या होणाऱ्या उल्लंघनावर नियंत्रण आणण्यासाठी सरकार मोठं पाऊल उचलणार असल्याची माहिती मिळत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Pune : पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नवे नाव राजगड; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा ऐतिहासिक निर्णय

Latest Marathi News Update live : राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला?

Rain Update : आजपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान विभागाने वर्तवला अंदाज

Pune Metro : पुणे मेट्रोच्या स्वारगेट–कात्रज मार्गावर दोन नवीन स्थानकांना मंजुरी