ताज्या बातम्या

रत्नागिरीतील लांज्याजवळ एलपीजी टँकर उलटल्यानं वाहतूक 15 तासांपासून ठप्प

रत्नागिरीतील लांज्याजवळ एलपीजी टँकर उलटल्यानं वाहतूक 15 तासांपासून ठप्प असल्याची माहिती मिळत आहे. लांज्याजवळ अंजणारी पुलावरून एलपीजी टँकर उलटल्यानं वाहतूक बंद ठेवण्यात आलीय. अपघातग्रस्त टँकरमधील गॅस बाहेर सुरक्षित बाहेर काढल्यानंतरच या मार्गावरची वाहतूक पूर्ववत होणार आहे. तोपर्यंत मुंबई-गोवा महामार्गावरची वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

रत्नागिरीतील लांज्याजवळ एलपीजी टँकर उलटल्यानं वाहतूक 15 तासांपासून ठप्प असल्याची माहिती मिळत आहे. लांज्याजवळ अंजणारी पुलावरून एलपीजी टँकर उलटल्यानं वाहतूक बंद ठेवण्यात आलीय. अपघातग्रस्त टँकरमधील गॅस बाहेर सुरक्षित बाहेर काढल्यानंतरच या मार्गावरची वाहतूक पूर्ववत होणार आहे. तोपर्यंत मुंबई-गोवा महामार्गावरची वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.

टँकरमध्ये गॅस असल्यानं आसपासच्या रहिवासी नागरिकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. या घटनेसंदर्भातील माहिती जिल्हा प्रशासनाकडून आसपासचे रहिवाशी आणि प्रवाशांना देणं गरजेचं होतं. पण जिल्हा प्रशासनाकडून तशी कोणतीच माहिती देण्यात आलेली नाही, अशी माहिती नागरिकांकडून मिळत आहे. गुरुवारी हा अपघात झाला. अपघातग्रस्त टँकर भारत पेट्रोलियम कंपनीचा आहे. हा टँकर मुंबई-गोवा महामार्गावरुन गोव्याच्या दिशेनं प्रवास करत होता. रत्नागिरीतील लांज्याजवळ अंजणारी पुलावरून एलपीजी टँकर नदीपात्रात कोसळला. साधारणतः 24 ते 28 किलो एलपीजी या टँकरमध्ये असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

टँकरमध्ये गॅस असल्यानं आसपासच्या रहिवासी नागरिकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. या घटनेसंदर्भातील माहिती जिल्हा प्रशासनाकडून आसपासचे रहिवाशी आणि प्रवाशांना देणं गरजेचं होतं. पण जिल्हा प्रशासनाकडून तशी कोणतीच माहिती देण्यात आलेली नाही, अशी माहिती नागरिकांकडून मिळत आहे. प्रशासनाकडून कालपासून एकच दावा सातत्यानं केला जात आहे की, गोवा आणि उरणहून तज्ज्ञांची टीम घटनास्थळी दाखल होणार आहे. तज्ज्ञांच्या मदतीनं या अपघातग्रस्त टँकरमधील एलपीजी काढून दुसऱ्या टँकरमध्ये ट्रान्सफर करण्यात येणार आहे. प्रशासनाकडून दावा करण्यात येत असला तरी, यासर्व गोष्टींसाठी एकूण किती कालावधी लागेल हे स्पष्ट सांगितलं जात नाही. तसेच, पथक अद्याप घटनास्थळी दाखल झालेलं नाही. मुंबई-गोवा महामार्ग ठप्प असून या मार्गावरची वाहतूक पुणस, काजगघाटी, रत्नागिरी अशी वळवण्यात आली आहे. तसेच, मुंबईच्या दिशेनं जाणारी वाहतूक शिपोली, पाली, दाभोळे या मार्गावरुन वळवण्यात आली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : अशिष शेलार आणि जयंत पाटील यांची विधान परिसरात भेट

Stock Market : शेअर बाजारात गुजरातची मोठी झेप; 1 कोटी गुंतवणूकदारांचा टप्पा पार

MNS In Pune : राज ठाकरेंविरोधातील वादग्रस्त वक्तव्य भोवलं; 'तो फटके खाणारचं...', मनसे कार्यकर्ते आक्रमक

Latest Marathi News Update live : मामा राजवाडेंचा भाजप पक्षप्रवेश थांबवला