ताज्या बातम्या

Andhra Pradesh Train Accident : आंध्र प्रदेशात रेल्वेचा भीषण अपघात; दोन पॅसेंजर ट्रेनची धडक, 6 प्रवाशांचा मृत्यू

आंध्र प्रदेशातील विझियानगरममध्ये दोन रेल्वे गाड्यांमध्ये टक्कर झाली. पॅसेंजर ट्रेन उभी असतानाच हा अपघात झालाय. या धडकेत पॅसेंजर ट्रेनच्या तीन बोगी रुळावरून घसरल्या. या दुर्घटनेत 6 प्रवाशांचा मृत्यू झाला असून,30 पेक्षा जास्त लोक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Published by : Team Lokshahi

आंध्र प्रदेशातील विझियानगरम (Vizianagaram) जिल्ह्यातील कोठावलसा तालुक्यात अलमांडा-कंटकपल्ली येथे मोठा रेल्वे अपघात झाला आहे. विशाखापट्टणम-रायगडा पॅसेंजर ट्रेन रुळावरून घसरली. ओव्हरहेड केबल तुटल्याने रायगडा पॅसेंजर ट्रेन रुळावर थांबली. मात्र, त्याचवेळी आलेल्या पलासा एक्स्प्रेसने रायगड गाडीला मागून धडक दिली. परिणामी रायगड पॅसेंजर ट्रेनच्या तीन बोगी रुळावरून घसरल्या. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला, तर 30 पेक्षा जास्त लोक जखमी झाले.

माहिती मिळताच अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळ गाठून मदतकार्य सुरू केले आहे. यावेळी घटनास्थळी वीज नसल्याने बचाव कार्यात मोठी अडचण येत आहे. डब्यांमध्ये प्रवाशांची संख्या अधिक असल्याने अनेक जण गंभीर जखमी झाल्याचे समजते. सर्व जखमींना लवकरात लवकर रुग्णालयात नेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आणि संबंधित अधिकाऱ्यांना बचाव कार्य करण्याचे निर्देश दिले. जखमींना नेण्यासाठी पुरेशा संख्येने रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्याचे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. या अपघातामधील प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना PMNRF कडून 2 लाख रुपये आणि जखमींना रु. 50,000 च्या मदतीची घोषणा करण्यात आली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा