Train accident in Odisha, 
ताज्या बातम्या

Odisha Train Accident: ओडिशात रेल्वेचा अपघात, चेन्नई-न्यू जलपाईगुडी एक्सप्रेसचे तीन डबे घसरले, प्रवासी सुरक्षित

Odisha Train Accident: ओडिशातील जाजपूर जिल्ह्यात जखापुरा स्थानकाजवळ मोठा रेल्वे अपघात टळला. चेन्नईहून न्यू जलपाईगुडीकडे जाणारी सुपरफास्ट एक्सप्रेस गुरुवारी सकाळी रुळावरून घसरली.

Published by : Riddhi Vanne

Odisha Train Accident: ओडिशातील जाजपूर जिल्ह्यात जखापुरा स्थानकाजवळ मोठा रेल्वे अपघात टळला. चेन्नईहून न्यू जलपाईगुडीकडे जाणारी सुपरफास्ट एक्सप्रेस गुरुवारी सकाळी रुळावरून घसरली. या घटनेत ट्रेनचे तीन डबे घसरले, त्यामुळे काही काळ प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं.

ही गाडी भुवनेश्वरमार्गे कोलकाताकडे जात असताना सकाळी सुमारे पावणेनऊच्या सुमारास हा प्रकार घडला. सुदैवाने या अपघातात कोणालाही इजा झाली नाही. सर्व प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

घटना समजताच बचाव आणि दुरुस्ती पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. डबे पुन्हा रुळावर आणण्याचं काम सुरू असून, बाधित रेल्वे मार्ग लवकरात लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी पोहोचून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

अपघात नेमका कशामुळे झाला, याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर सविस्तर चौकशी केली जाणार असल्याचं रेल्वे विभागाने सांगितलं आहे. तोपर्यंत सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व आवश्यक खबरदारी घेतली जात आहे.

थोडक्यात

• ओडिशातील जाजपूर जिल्ह्यात जखापुरा रेल्वे स्थानकाजवळ मोठा अपघात टळला
• चेन्नईहून न्यू जलपाईगुडीकडे जाणारी सुपरफास्ट एक्सप्रेस रुळावरून घसरली
• गुरुवारी सकाळी ही घटना घडली
• ट्रेनचे तीन डबे रुळावरून घसरले
• प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं
• सुदैवाने मोठी जीवितहानी टळली

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा