ताज्या बातम्या

पोलीस दलातील 25 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

Published by : shweta walge

राज्यातील 25 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदली झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये उप आयुक्त तसेच पोलिस अधिक्षक पदाच्या पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूरसह अनेक शहरातील पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. आज सायंकाळी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले.

पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुखांची बदली झाली आहे. अंकित गोयल आता पुणे ग्रामीणचे नवे पोलीस अधीक्षक आहेत. यापुर्वी ते गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक होते. त्यांनी गडचिरोलीतील ग्रामीण भागात राबविलेल्या विविध उपक्रमांमुळे गोयल चर्चेत आले होते. त्यांची नियुक्ती आता पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकपदी करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणूका, जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी त्यांच्यासमोर आव्हान असणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा