Yusuf Pathan latest News 
ताज्या बातम्या

क्रिकेटच्या नव्हे, राजकीय मैदानात उतरणार युसूफ पठाण, तृणमूल काँग्रेसने बहरामपूरमधून दिली उमेदवारी

तृणमूल काँग्रेसने भारताचा माजी क्रिकेटर युसूफ पठाणला बहरामपूर मतदार संघात लोकसभेच्या उमेदवारीचं तिकिट दिलं.

Published by : Naresh Shende

आगामी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी विविध मतदारसंघात उमेदवार घोषीत करायला सुरुवात केलीय. दरम्यान, तृणमूल काँग्रेसने भारताचा माजी क्रिकेटर युसूफ पठाणला बहरामपूर मतदार संघात लोकसभेच्या उमेदवारीचं तिकिट दिलं आहे. काँग्रेसच्या अधीर रंजन चौधरींविरोधात युसूफ पठाण मैदानात उतरणार आहे.

तृणमूल काँग्रेसने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या पक्षाच्या यादीत एकूण ४२ उमेदवारांची नावे आहेत. दिग्गज क्रिकेटपटू युसूफ पठाणला बहरामपूरमधून तिकीट देण्यात आलं असून ते अधीर रंजन चौधरी यांच्याविरुद्ध लढणार आहे. आता या निवडणुकीत कोणता उमेदवार बाजी मारणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा