Madhya Pradesh 
ताज्या बातम्या

Madhya Pradesh : मध्यप्रदेशात दुर्गा देवीच्या विसर्जनादरम्यान 10 भाविकांचा मृत्यू

अनेक जण अजूनही बेपत्ता असल्याची माहिती

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात

  • मध्यप्रदेशात दुर्गा देवीच्या विसर्जनादरम्यान ट्रॅक्टर तलावात कोसळला

  • या घटनेत 10 भाविकांचा मृत्यू

  • अनेक जण अजूनही बेपत्ता असल्याची माहिती

(Madhya Pradesh) मध्यप्रदेशात दुर्गा देवीच्या विसर्जनादरम्यान ट्रॅक्टर तलावात कोसळून दुर्घटना झाल्याची घटना घडली. या घटनेत 10 भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. मृतांमध्ये तीन अल्पवयीन मुलांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यात गुरुवारी विसर्जनासाठी दुर्गा देवीच्या मूर्ती घेऊन जाणारा ट्रॅक्टर तलावात कोसळून ही घटना घडली. ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर एकूण 30 भाविक असल्याची माहिती मिळत आहे. अपघातात तीन जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अनेक जण अजूनही बेपत्ता असल्याचे बोलले जात आहे. ट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळत असून घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या ग्रामस्थांनी नागरिकांना वाचवण्यासाठी बचाव कार्य सुरु केलं.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : पंतप्रधान मोदी 2 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर

Sanjay Raut : एक रिक्षावाला, आज 5 लाख कोटींचा मालक, कोणामुळे ? राऊतांनी शिंदेंना सुनावलं

Mega Block : मध्य रेल्वेवर आज मेगाब्लॉक, नोकरदार लोकांचे हाल होण्याची शक्यता

Vladimir Putin : "भारत कोणासमोरही झुकणार नाही..."; रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन भारताबद्दल म्हणाले...