ताज्या बातम्या

Mannat Bungalow : शाहरुख खान यांच्या 'मन्नत' बंगल्यावर CRZ नियमांचं उल्लंघन ?; तपासणीसाठी वनविभागासह BMC ची संयुक्त कारवाई

‘मन्नत’ ही एक वारसा हक्क असलेली वास्तू असून त्याला जोडून अ‍ॅनेक्स नावाची बहुमजली इमारत आहे.

Published by : Team Lokshahi

मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील बँडस्टँड परिसरातील अभिनेता शाहरुख खान यांच्या 'मन्नत' या प्रसिद्ध बंगल्याच्या नूतनीकरणादरम्यान कोस्टल रेग्युलेशन झोन (CRZ) नियमांचे उल्लंघन झाल्याच्या तक्रारीनंतर वनविभाग आणि मुंबई महापालिकेच्या (BMC) अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे शुक्रवारी पाहणी केली.

‘मन्नत’ ही एक वारसा हक्क असलेली वास्तू असून त्याला जोडून अ‍ॅनेक्स नावाची बहुमजली इमारत आहे. सद्य:स्थितीत खान कुटुंबीय नूतनीकरणामुळे जवळच अन्य ठिकाणी राहतात. त्यामुळे पाहणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना त्यांच्या स्टाफने माहिती दिली की, सर्व कायदेशीर परवानग्यांची कागदपत्रे लवकरच सादर केली जातील. शाहरुख खान यांच्या मॅनेजर पूजा दादलानी यांनी स्पष्ट केले की, “काम नियमानुसार सुरू आहे आणि कोणतीही तक्रार अद्याप आली नसली तरी चौकशीस आम्ही सहकार्य करू.”

या नूतनीकरणात अ‍ॅनेक्स इमारतीला दोन मजले वाढवण्याचे काम सुरू आहे. यासाठी महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटी (MCZMA) कडून परवानग्या घेतल्याचेही नमूद करण्यात आले. वनविभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “तक्रारीच्या आधारे आम्ही पाहणी केली असून यासंदर्भातील अहवाल लवकरच सादर केला जाईल.”

या तपासणीमध्ये BMC च्या एच-वेस्ट वॉर्डमधील बांधकाम व कारखाना विभाग तसेच इमारत प्रस्ताव विभागाचे अधिकारीही सहभागी होते. मात्र महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं की, “आमची भूमिका केवळ सहकार्य करण्यापुरती होती.”

दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी या बांधकामाची तक्रार केली होती. माजी IPS अधिकारी व वकील वाय. पी. सिंग यांनी गंभीर आरोप करत सांगितलं की, मूळ ‘व्हिला व्हिएन्ना’ या वारसा हक्काच्या इमारतीच्या मागे 2005 मध्ये 7 मजली अ‍ॅनेक्स उभारण्यात आली आणि कायदेशीर अडथळ्यांवर मात करण्यासाठी 12 छोट्या फ्लॅट्सच्या नावाखाली परवानगी घेतली गेली. मात्र, नंतर ते सर्व एकत्र करून आलिशान बंगला उभारण्यात आला.

हेही वाचा

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Sanjay Shirsat On Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : "पडझड ही उबाठा गटाची झाली, राज ठाकरेंची नाही"

Raj Thackeray On Devendra Fadnavis : "माझे वडील आणि काका इंग्रजीत शिकले पण..." फडणवीसांच्या टीकेला राज ठाकरेंकडून सडेतोड उत्तर

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : सुप्रिया सुळे यांनी आदित्य ठाकरे यांना खेचलं, स्टेजवर नेमकं काय घडलं?

Uddhav Thackeray on Eknath Shinde : "एका गद्दाराने काल 'जय गुजरात' अशी घोषणा केली" उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेवर निशाणा