अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे निकटवर्तीय आणि उजव्या विचारसरणीचे कार्यकर्ते चार्ली कर्क यांची युटा व्हॅली विद्यापीठात गोळ्या घालून हत्या करण्यात आली. ते 31 वर्षीय कर्क 'अमेरिकन कमबॅक' या मोहिमेअंतर्गत विद्यार्थ्यांसमोर भाषण करत असताना त्यांच्यावर अचानक झालेल्या गोळीबारात त्यांच्या मानेला गोळी लागली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यांच्या मृत्यूनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी दु:ख व्यक्त केले.
याचपार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. ट्रम्प यांनी केलेले वक्तव्य आतापर्यंत आश्चर्यकारक ठरली आहेत. प्रत्येक सुरु असलेल्या घटनेवर ट्रम्प स्वतःच्या वैयक्तिक मताने संपुर्ण जगाला विचारात पाडतात. त्यांच्या जवळच्या सहकाऱ्याचे म्हणजेच चार्ली कर्क यांच्यावर झाडण्यात आलेल्या गोळीबारासंदर्भात ट्रम्प यांनी एक मोठा ट्विस्ट आणला आहे.
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फॉक्स न्यूजशी बोलताना म्हटले आहे की, "मला खात्री आहे की आम्ही योग्य गुन्हेगाराला पकडले आहे. आम्ही स्थानिक पोलिसांसोबत आणि राज्यपालांसोबत उत्तम काम केले. आम्ही एका क्लिपने सुरुवात केली ज्यात तो मुंगीसारखा दिसत होता, ते आमच्यासाठी निरुपयोगी ठरतं होते".
"आम्ही गेल्या अडीच दिवसांत खूप काम केले. अशी व्यक्ती मिळवणे ज्याची सुरुवात तुम्ही अगदी शून्यातून करता, तेव्हा ते आश्चर्यकारक असते. आम्हाला वाटते की आम्ही ज्या व्यक्तीला शोधत होतो त्याला आम्ही पकडले आहे." अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी सांगितल्याप्रमाणे एका संशयिताला हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. त्यामुळे आता हे पाहण महत्त्वाच ठरणार आहे.