ताज्या बातम्या

“तुनिषा शर्माचा मृत्यू हा ‘लव्ह जिहाद’चा प्रकार” - गिरीश महाजन

अभिनेत्री तुनिषा शर्माने वसई येथे चित्रीकरण सुरु असलेल्या सेटवरच आत्महत्या केल्याचे समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती.

Published by : Siddhi Naringrekar

अभिनेत्री तुनिषा शर्माने वसई येथे चित्रीकरण सुरु असलेल्या सेटवरच आत्महत्या केल्याचे समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. छोट्या पडद्यावर कमी कालावधीत यश संपादन करणाऱ्या या तरुण अभिनेत्रीच्या आयुष्यात असं काय झालं की तिला आयुष्य संपवावं लागलं, यावर प्रचंड चर्चा होत आहे. यानंतर तिचा कथित प्रियकर शिझान खान याला काल अटक करण्यात आली आहे. त्यावरच आता भाजपा नेते व मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

गिरीश महाजन म्हणाले की, हे प्रकरण लव्ह जिहादचा विषय आहे आणि पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. आम्ही पाहत आहोत की, दिवसेंदिवस ही प्रकरणं वाढतच आहेत आणि आम्ही या विरोधात कडक कायदा आणण्याचा विचार करत आहोत.” असे त्यांनी सांगितले.

यावर राम कदम यांनी देखिल प्रतिक्रिया दिली होती की, चौकशीत लव्ह जिहादचा अँगल समोर आला तर त्यादृष्टीने देखील सखोल चौकशी होईल, लव्ह जिहादच्या मागे कोणती संघटना आहे का? त्यांचे काय षडयंत्र आहे? याचाही तपास पोलिस करतील आणि तुनिषाच्या कुटुंबाला न्याय मिळवून देतील, असे ते म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर

Fake Crop Insurance : नांदेडमधील 'बोगस' पीक विमा घोटाळा उघड; बीडचे 9 एजंट, उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांच्या नावानेही विमा

Saamana Editorial : 'शेतकऱ्यांना कर्जमाफीचे गाजर दाखवून त्यांनी...'; 'सामना'तून सरकारवर साधला निशाणा

Shubhanshu Shukla Axiom 4 : शुभांशु शुक्लानं ISS च्या कक्षेत पूर्ण केला एक आठवडा; सांगितलं पुढील कामाचं नियोजन