थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली Scoll करा...
(Dehil Blast ) राजधानी दिल्लीला हादरवून सोडणाऱ्या अलीकडच्या बॉम्बस्फोट प्रकरणात आता आंतरराष्ट्रीय षड्यंत्राचे धागे जोडले जात असल्याचे समोर आले आहे. तपास यंत्रणांना मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या स्फोटांचा धागा थेट तुर्कीपर्यंत पोहोचतो आहे. आरोपी डॉक्टर मोहम्मद उमर आणि डॉक्टर मुझम्मिल शकील यांच्या पासपोर्ट तपासात दोघेही काही महिन्यांपूर्वी तुर्कीला गेले होते, असा महत्त्वपूर्ण पुरावा समोर आला आहे. तपासकर्त्यांचा अंदाज आहे की, तुर्कीत त्यांनी काही संशयास्पद व्यक्तींशी भेट घेतली असावी. या भेटींचा नेमका उद्देश काय होता आणि त्यांचा दिल्लीतील स्फोटांशी संबंध आहे का, याचा सखोल तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडून (NIA) सुरू आहे.
टेलिग्राम गृपद्वारे तयार झालं ‘डॉक्टर मॉड्यूल’
या प्रकरणात आणखी एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. तपासात असे दोन टेलिग्राम गृप आढळले आहेत ज्यांच्याद्वारे स्फोटांमागील ‘डॉक्टर मॉड्यूल’ तयार करण्यात आले होते. यापैकी एक गृप पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या ऑपरेटिव्ह उमर बिन खट्टाबकडून चालवला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. तपास अधिकाऱ्यांच्या मते, उमर आणि मुझम्मिल यांनी या गृपद्वारे हँडलरशी संपर्क साधला होता. त्यानंतर त्यांना काही विशिष्ट सूचना मिळाल्या होत्या. मात्र या सूचनांमध्ये नेमकं काय होतं, हे अद्याप उघड करण्यात आलेले नाही.
लाल किल्ल्याची रेकी : हल्ल्याचा अपयशी प्रयत्न?
पीटीआयच्या माहितीनुसार, आरोपी डॉ. मुझम्मिल शकील यांनी जानेवारी महिन्यात लाल किल्ला परिसरात अनेक वेळा फेरफटका मारला होता. पोलिसांनी त्याच्या मोबाइल लोकेशन आणि सीसीटीव्ही फुटेजमधून ही माहिती निश्चित केली आहे.
सुरक्षा अधिकाऱ्यांच्या मते, 26 जानेवारीच्या पार्श्वभूमीवर लाल किल्ल्यावर मोठा दहशतवादी हल्ला करण्याचा कट असावा. मात्र त्या काळात परिसरात कडक बंदोबस्त असल्याने हा प्रयत्न फसला असण्याची शक्यता तपासली जात आहे.
तसेच, मुझम्मिलने लाल किल्ला परिसरातील गर्दीची वेळ, प्रवेशमार्ग आणि सुरक्षा तपासणीच्या सवयींचा बारकाईने अभ्यास केला होता. यावरून हे संपूर्ण षड्यंत्र किती नियोजित आणि संघटित पद्धतीने रचले गेले होते, हे स्पष्ट होते.
तपासाचा फोकस आंतरराष्ट्रीय नेटवर्कवर
सध्या दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकासह गुप्तचर विभाग, NIA आणि सायबर युनिट मिळून या प्रकरणाचा तपास करत आहेत. तुर्कीतील प्रवास, टेलिग्रामवरील संवाद आणि आर्थिक व्यवहार या तिन्ही गोष्टींचा एकत्रित तपास केला जात आहे. प्राथमिक तपासात काही ट्रान्झॅक्शन विदेशी खात्यांशी निगडित असल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे.
अधिकाऱ्यांकडून मौन : तपास अद्याप सुरू
तपास यंत्रणा या टप्प्यावर कोणतीही अधिकृत टिप्पणी करण्यास टाळत आहेत. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय नेटवर्कचा ठोस पुरावा मिळाल्यास काही दिवसांतच आणखी अटकांची शक्यता नाकारता येत नाही.
Summery
राजधानी दिल्लीला हादरवून सोडणाऱ्या अलीकडच्या बॉम्बस्फोट प्रकरणात आता आंतरराष्ट्रीय षड्यंत्राचे धागे जोडले
या स्फोटांचा धागा थेट तुर्कीपर्यंत पोहोचतो आहे.
तपासकर्त्यांचा अंदाज आहे की, तुर्कीत त्यांनी काही संशयास्पद व्यक्तींशी भेट घेतली असावी.