भारतीय क्रिकेट संघाचा सर्वोत्तम खेळाडू विराट कोहली सध्या एका वेगळ्या गोष्टीसाठी चर्चेत आहे. आयपीएलचा हंगाम सुरू असून विराट त्याच्या फटकेबाजीसोबतच त्याच्या लोकप्रियतेमुळेही ओळखला जातो. विराटच्या याच लोकप्रियतेचा फायदा एका अभिनेत्रीला झाला आहे. अवनीत कौर या कलाकाराच्या सोशल मीडियावर विराट कोहलीमुळे खळबळ उडाली आहे.
विराट कोहलीकडून टीव्ही अभिनेत्री अवनीत कौरची एक इंस्टाग्राम पोस्ट चुकून लाईक झाली. ज्यामुळे लोकांनी सोशल मीडियावर कोहलीला ट्रोल करायला सुरुवात केली. हे प्रकरण इतके वाढले की, विराट कोहलीला त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर एक स्टोरी शेअर करून स्पष्टीकरण द्यावे लागले. विराटने चुकून अवनीत कौरची पोस्ट लाईक केल्यानंतर लोकांनी सोशल मीडियावर अवनीतला शोधले. यानंतर अवनीत कौरच्या फॉलोअर्समध्ये सुमारे 20 लाखांनी वाढ झाली. विराटने अवनीतची पोस्ट लाईक करण्यापूर्वी तिचे 3 कोटी फॉलोअर्स होते. आता अवनीतचे 31.8 दशलक्ष फॉलोअर्स झाले आहेत. सोशल मीडियावरही तिच्या फॉलोअर्सची चर्चा होताना दिसत आहे.