Team Lokshahi
ताज्या बातम्या

संगमनेरच्या प्रवरा नदीत आढळले दोन मृतदेह

संगमनेरमधून वाहणाऱ्या अमृतवाहिनी प्रवरा नदीमध्ये मोठ्या पुलाजवळ दोन मृतदेह आढळून आले आहे.

Published by : shweta walge

आदेश वाकळे,संगमनेर: संगमनेरमधून वाहणाऱ्या अमृतवाहिनी प्रवरा नदीमध्ये मोठ्या पुलाजवळ दोन मृतदेह आढळून आले आहे. यामुळे एकच खळबळ संगमनेरमध्ये उडाली आहे. या ईसमांचे मृत्यू नेमके कशामुळे झाले याचा शोध घेण्याचे आव्हान शहर पोलिसांसमोर निर्माण झाले आहे.

संगमनेरच्या प्रवरा नदीपात्रातील मोठ्या पुलाखाली आणि तेथून काही अंतरावर असलेल्या फादरवाडी जवळ नदीपात्रात दोन पुरुषांचा मृतदेह आढळून आला आहे. शहर पोलिसांना याची माहिती मिळताच पोलीस पथकाने घटनास्थळी जाऊन मृतदेह नदीपात्रातून शवविच्छेद गृहामध्ये आणले आहे.

दरम्यान दोन मृतदेहापैकी एकाची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले असून हा मृतदेह शहरातीलच मोगलपुरा पुणे नाका येथील अमोल अण्णासाहेब आव्हाड याचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. आव्हाड बेपत्ता झाल्या संदर्भात शहर पोलीस ठाण्यात नोंद देखील करण्यात आली होती. तर दुसऱ्या मृतदेहाची ओळख पटली नसून साधारणता 35 वर्षे वयोगटातील हा तरुण आहे. यासंदर्भात अधिक माहिती असल्यास शहर पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : हार्बर आणि ट्रान्स हार्बर रेल्वे वाहतूक बंद

Harbour Line : हार्बर आणि ट्रान्स हार्बर रेल्वे वाहतूक बंद

Latest Marathi News Update live : पुण्यात अमली पदार्थांचा सुळसुळाट

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस चांगला जाईल, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य