वाढदिवस झाला अन बालकाचा मृत्यू : कारणीभूत ठरला खड्डा
Team Lokshahi

वाढदिवस झाला अन बालकाचा मृत्यू : कारणीभूत ठरला खड्डा

बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील दसरखेड येथील घरकुलाच्या बांधकामा दरम्यान शौचालयासाठी खोदून ठेवलेल्या खड्ड्यात पडून दोन वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आहे.
Published by :
shweta walge

संदिप शुक्ला, बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील दसरखेड येथील घरकुलाच्या बांधकामा दरम्यान शौचालयासाठी खोदून ठेवलेल्या खड्ड्यात पडून दोन वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आहे. शौर्य गणेश इंगळे अस मृत्यू झालेल्या बालकाच नाव आहे. वाढदिवशी घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

शौर्य हा घराच्या अंगणात खेळत असताना खड्ड्याजवळ गेला आणि खड्ड्यात पडला. आई घर कामात व्यस्त होती. तर वडील कामावर गेले असताना ही अंगावर शहारे आणणारी घटना घडली आहे. घरात काम करत असलेल्‍या आईला बराच वेळ झाल्यावर शौर्य दिसत नसल्याचे लक्षात आले. यानंतर आईने शोधाशोध केली. परंतु शौर्य मिळून आला नाही. यानंतर खड्ड्यात पाहिले असता ही घटना उघडकीस आली. शौर्यला खड्ड्यातून बाहेर काढून मलकापूर येथील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

वाढदिवसाच्‍या दुसऱ्याच दिवशी मृत्‍यू

शौर्य याचा दुर्देवी मृत्‍यू झाला. तत्‍पुर्वी आदल्‍याच दिवशी शौर्यचा वाढदिवस उत्‍साहात साजरा करण्यात आला होता. वाढदिवसाच्‍या दुसऱ्याच दिवशी शौर्यला मृत्‍यूने गाठले.

वाढदिवस झाला अन बालकाचा मृत्यू : कारणीभूत ठरला खड्डा
सदाभाऊ खोत यांनी रसवंतीगृहावर स्वतः काढला उसाचा रस
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com