Wardha Team Lokshahi
ताज्या बातम्या

बस, दुचीकाच्या अपघातात दोघे जण ठार

धडकेत दुचाकीस्वार दोघांना काही अंतरावर फेकुन दिले यात रामदास भलावी यांचा जागीच मृत्यू झाला

Published by : Sagar Pradhan

भूपेश बारंगे|वर्धा: कारंजा येथे नागपूर अमरावती महामार्गवर पांडे पेट्रोल पंप जवळ आज सायंकाळच्या सुमारास बसची दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोन जणांचा मृत्यू झाला.

कारंजा तालुक्यातील मेठहिरजी येथील प्रल्हाद युवनाते व रामदास भलावी हे दोघेही दुचाकीने कारंजा येथील बाजार पेठेत आले होते. दिवसभर काम करून सायंकाळी परत जाताना कारंजा जवळील राष्ट्रीय महामार्गावरील पांडे पेट्रोल पंप जवळ अमरावती कडून नागपूर कडे जाणाऱ्या बस क्रमांक महा.13 सीयू 8332 च्या चालक उमेश चौधरी यांनी दुचाकी क्रमांक महा. 31 केआर 5798 ला धडक दिली. बस जबर धडक लागल्याने बसच्या समोरील चाकात दुचाकी अडकली या धडकेत दुचाकीस्वार दोघांना काही अंतरावर फेकुन दिले यात रामदास भलावी वय 65 यांचा जागीच मृत्यू झाला.

तर दुचाकी चालक प्रल्हाद युवनाते गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ कारंजा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यावेळी त्याचा मृत्यू झाला. या अपघातात दोघांचाही मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी बस चालकाला ताब्यात घेतले आहेय.या घटनेत दुचाकी वाहन मागून बसची धडक दिली असल्याचे प्रथमदर्शनी नागरिक सांगत होते. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक दारासिंग राजपूत ,उपनिरीक्षक सचिन मानकर, नितेश वैद्य ,गुड्डू थुल ,अंकुश रामटेके तपास करत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा