Firing Team Lokshahi
ताज्या बातम्या

धक्कादायक! SRPF च्या दोन जवानांनी झाडल्या एकमेकांवर गोळ्या

गोळी लागून दोघांचाही मृत्यू

Published by : Shweta Shigvan-Kavankar

गडचिरोली : राज्य राखीव पोलीस दलाच्या (SRPF) दोन जवानांनी एकमेकांवर गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना गडचिरोली (Gadchiroli) येथे घडली आहे. याप्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये नोंद झाली असून पुढील तपास सुरु आहे. श्रीकांत बेरड, बंडू नवथरे अशी मृतकांची नावे आहेत. दोघेही दौंड पुणे येथील एसआरपीएफ कॅम्पचे जवान होते.

गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील मरपल्ली पोलीस मदत केंद्र येथे श्रीकांत बेरड आणि बंडू नवथरे तैनात होते. या दोन्ही जवानांनी वैयक्तिक वादातून रायफलमधून एकमेकांवर गोळीबार केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यामध्ये गोळी लागून दोघांचाही मृत्यू झाला आहे.

घटना घडल्यानंतर उत्तरीय तपासणीसाठी दोन्ही जवानांचे शव जिल्हा सामान्य रूग्णालय येथे आणण्यात आले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पुढील तपास करण्याचे आदेश दिल्याची माहिती सुत्रांकडून प्राप्त झाली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Reason for Gandhi photo on notes : भारतीय चलनाच्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो का ? जाणून घ्या

Pune Crime : धक्कादायक! पुण्यात पैशांसाठी आई-वडिलांनी पोटच्या लेकीला विकलं

Kangana Ranaut : भाषावादामध्ये कंगना रनौतची उडी ; म्हणाली, "माणसांना दूर करणाऱ्या गोष्टींपासून दूर..."

Home Remedies To Relieve Mouth Pain : तोंडातील फोडं, जळजळ आणि वेदना? आता मिळवा त्वरित आराम!