ताज्या बातम्या

Chhatrapati Sambhajinagar : दुधवाल्याचा निष्काळजीपणा! दोन एसटी बस आणि कारची धडक होऊन भीषण अपघात, 25 प्रवासी जखमी

छत्रपती संभाजीनगर शहरातील निपाणी फाट्यानजीक बुधवारी सकाळी एक मोठा अपघात घडला असून या अपघातात दोन एसटी बस आणि एक कार एकमेकांवर धडकल्या.

Published by : Team Lokshahi

छत्रपती संभाजीनगर शहरातील निपाणी फाट्यानजीक बुधवारी सकाळी एक मोठा अपघात घडला असून या अपघातात दोन एसटी बस आणि एक कार एकमेकांवर धडकल्या. या दुर्घटनेत तब्बल 25 प्रवासी जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे, हा अपघात एका दूधवाल्याच्या निष्काळजी वागण्यामुळे झाला असून अपघातानंतर संबंधीत दूधवाला घटनास्थळावरून पसार झाला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर येथील सिडको बसस्थानकातून लातूरकडे जाणारी एसटी बस सकाळी 8 वाजता निघाली होती. बसमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी होती. ही बस निपाणी फाट्यानजीक पोहोचताच समोर जात असलेल्या दूधवाल्याच्या दुचाकीवरील दुधाची कॅन रस्त्यावर पडली. त्यामुळे दुधवाल्याने दुचाकी अचानक थांबवली. त्यामागे येणाऱ्या कारचालकाने (एमएच 46- एन 1038) ब्रेक दाबून गाडी थांबवली.

या अचानक ब्रेकमुळे त्यामागे असलेली छत्रपती संभाजीनगर - इचलकरंजी बस (एमएच 09 - एफएल 7435) थोड्याच अंतरावर आली होती. तिने ही गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र तिच्या मागून येणाऱ्या छत्रपती संभाजीनगर - लातूर बसने पूर्ण वेगात येऊन इचलकरंजी बसवर धडक दिली. त्यामुळे कार, इचलकरंजी बस आणि लातूर बस एकमेकांवर आदळून मोठे नुकसान झाले.

दुर्घटनेत 25 प्रवासी जखमी

या अपघातात दोन्ही बसमधील एकूण 25 प्रवासी जखमी झाले असून काहींना किरकोळ तर काहींना गंभीर दुखापती झाल्या आहेत. अपघाताची माहिती मिळताच पाचोड बसस्थानकाचे वाहतूक नियंत्रक एस. एस. पठाडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी रुग्णवाहिका, वाहतूक पोलीस आणि इतर संबंधित यंत्रणांना माहिती दिली. जखमींना तत्काळ रुग्णालयात हलवण्यात आले असून इतर प्रवाशांना दुसऱ्या बसमधून पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आले आहे.

दूधवाला फरार, पोलिसांचा शोध सुरू

दुचाकीवरील दूधवाला अपघाताची प्रमुख कारणीभूत ठरला असून अपघातानंतर तो घटनास्थळावरून फरार झाला आहे. पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे. या अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

हेही वाचा

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raj Thackeray : "कोण जैन लोक आहेत जी...", फडणवीसांच्या भेटीनंतर राज ठाकरेंनी बेस्ट पतपेढी पराभवासह अनेक मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली

Latest Marathi News Update live : राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा

Gujrat Rain Update : गुजरातमध्ये समुद्र खवळला; तीन बोटी बुडाल्या

Chhatrapati Sambhajinagar : "काळजी घ्या" मृत्यूपूर्वी वडिलांना फोन! सिलेंडरमध्ये खुपसवली कात्री अन् स्फोटादरम्यान CA विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू