ताज्या बातम्या

Mock Drill : उद्या मॉक ड्रिल जारी! मुंबईत 'ही' ठिकाणे लाखो लोकांना लपण्यासाठी सर्वोत्तम पर्याय

Mock Drill: मुंबईत उद्या मॉक ड्रिल, दोन भुयारी मार्ग लाखो मुंबईकरांना सुरक्षिततेचा सर्वोत्तम पर्याय.

Published by : Prachi Nate

पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान मध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे भारत पाकिस्तान दोन्ही देशात युद्ध होण्याच्या शक्यता वर्तवली जात आहे. अशातच देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहर नेहमीच दहशतवाद्यांच्या आणि पाकिस्तानच्या टॉप लिस्टवर असते. त्यामुळे मुंबईत उद्या दुपारी 4 वाजता होणाऱ्या मॉक ड्रिलकडे सगळ्यांचे लक्ष आहे. तसेच देशभरातील 244 ठिकाणी मॉक ड्रिल करण्यात येणार आहे.

ज्यामध्ये महाराष्ट्रात 16 शहरांमध्ये हा मॉक ड्रिल होणार आहे. पाकिस्तानसोबत वाढत्या तणावाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्या देशव्यापी मॉक ड्रिल करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र यादम्यान करोडो लोकांच जीवनचक्र चालवणारी ही मुंबई मॉक ड्रिलसाठी सज्ज झाली आहे. तसेच यावेळी मुंबईकरांना आपत्तीच्या वेळेस लपण्यासाठी मुंबईतले दोन भुयारी मार्ग सर्वोत्तम पर्याय आहेत. कोणते ते जाणून घ्या.

मुंबईतील दोन भुयारी मार्ग-

देशात सर्वाधिक लोकसंख्या मुंबईमध्ये आहे. त्यामुळे मुंबईकरांना आपत्तीच्या वेळेस लपण्यासाठी कोस्टल रोडवरील दोन भुयारी मार्ग सर्वोत्तम पर्याय ठरत आहेत. कोस्टल रोडवरील हे दोन भुयारी मार्ग लाखो मुंबईकरांचे प्राण वाचवू शकतात. त्यामगचं कारण असं की, हे दोन्ही भुयार मार्ग दोन किलोमीटर लांबीचे आहेत, ज्यामध्ये दहा लाखांहून अधिक नागरिक सुरक्षित राहू शकतात.

मॉक ड्रिलमध्ये धोक्याच्या परिस्थितीत, युद्धजन्य परिस्थितीत शत्रू देशांनी हल्ला केल्यास काय करावे, याबद्दल माहिती दिली जाते. याचे नाट्य रुपांतर केलं जातं. आपत्कालीन परिस्थितीत लोक याला कशी प्रतिक्रिया देतात हे पाहिलं जातं. यामध्ये सायरन, ब्लॅक आऊट, एअर स्ट्राईक अलर्ट असे प्रशिक्षण दिले जाते. उद्या देशभरात नागरिकांच्या सुरक्षेसाठी एक सायरन वाजवला जाईल. ज्यानंतर लाइट्स बंद केले जातील. तसेच उंच उंच इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी त्वरित खाली उतरा आणि सुरक्षित स्थळी जमा व्हावे. त्याचसोबत इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद करावेत .

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Nashik-Mumbai Highway Accident : नाशिक-मुंबई महामार्गावर भीषण अपघात! बस चालकाचं नियंत्रण सुटलं अन्...15 ते 20 प्रवासी

Beed Rain : बीडमध्ये पावसाचा हाहाकार! सहा गावांमध्ये 44 जण अडकले, बचाव मोहिमेसाठी...

Asia Cup 2025 IND vs PAK : हस्तांदोलन वादावरून पाकिस्तानचा संताप उफाळला! आयसीसीसमोर ठेवले अल्टिमेटम