Dadar Station Team Lokshahi
ताज्या बातम्या

दादरमध्ये दोन रेल्वे आमने-सामने; हजारो प्रवाशांचा जीव वाचला

दादर रेल्वे स्थानकावर घडलेल्या घटनेमुळे प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.

Published by : Sudhir Kakde

मुंबई : माटुंग्याजवळ दोन रेल्वे आमने सामने आल्याची घटना घडली आहे. दादरच्या (Dadar) प्लॅट फॉर्म क्रमांक सातवर ही घटना घडली आहे. दोन रेल्वेची क्रॉसींग होत असताना हा अपघात घडला आहे. यावेळी ओव्हरहेड वायर्समध्ये शॉर्टसर्कीट झाल्याने काही आवाज देखील झाल्याचं प्रवाशांकडून सांगण्यात येतंय. दोन एक्सप्रेस आमने सामने आल्याने प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं. गदग एक्सप्रेस आणि पॉंडीचेरी एक्सप्रेस एमेकांवर आदळता आदळता थोडक्यात बचावल्या आहेत. त्यामुळे हजारो प्रवाशांचा जीव वाचला. ११००५ या रेल्वेची गदग एक्सप्रेसला धडक दिल्याने काही डबे रुळावरुन घसरल्याची माहिती रेल्वेचे माहिती व संपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली आहे. (Gadag Express pondicherry expres Accident in Dadar)

Dadar Railway Station

रेल्वे रुळावर दोन रेल्वे आमने सामने आल्यानंतर काही वेळासाठी वाहतुक विस्कळीत झाली आहे. यामुळे मध्य रेल्वेची वाहतुक यामुळे खोळंबली आहे. या घटनेत रेल्वेचे तीन डबे रुळावरुन घसरल्याची देखील माहिती समोर आली आहे. हा अपघात झाला त्यावेळी शॉर्टसर्कीट देखील झाल्याची माहिती समोर आली आहे.

या घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन, अग्निशामक दल, पोलीस यांच्यासह सर्व यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.त्यानंतर आता बचाव कार्य सुरु झालं असून, वाहतूक सुरळीत करण्याचं काम सुरु झालं आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा