मुंबई लोकलमधील भांडणं हे काही मुंबईकरांसाठी नवीन नाही. त्यातही विरार लोकलच्या महिलांच्या डब्यामधील छोट्या-मोठ्या वादातून होणारी भांडणं हा नेहमीचाच मुद्दा झाला आहे. मात्र आता भांडणांचे रुपांतर हाणामारीत आणि त्यातून एकमेकींना इजा पोहोचवण्यापर्यंत या प्रवासी महिलांची मजल गेली आहे. असाच एक भयंकर हाणामारीचा व्हायरल व्हिडिओ समोर आला आहे. महिला प्रवाशांनी विरार लोकलचा महिलांचा डब्बा खचाखच भरलेला असताना दोन महिलांमध्ये तुफान हाणामारीला सुरूवात झाली. या हाणामारीत एका महिलेच्या चेहऱ्यावर रक्त ओघळताना दिसत आहे. आजूबाजूच्या प्रवासी महिला हे भांडण थांबवण्याचा अतोनात प्रयत्न करत आहेत. मात्र त्या दोघी महिला काही ऐकायला तयार नाहीत, असे व्हिडिओमधून दिसत आहे.
हेही वाचा