ताज्या बातम्या

पुणे अत्याचार प्रकरणावर सुषमा अंधारे आक्रमक, म्हणाल्या, "पोलिसांचा धाक उरला नाही..."

सुषमा अंधारेंने परिवहन मंत्र्यांवरही साधला निशाणा

Published by : Team Lokshahi

पुणे येथे 26 वर्षीय तरुणीवर स्वारगेट बस स्थानकात अतिप्रसंग झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. अशातच आता उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या घटनेचा जाहीर निषेध केला आहे. या घटणेबद्दल सुषमा अंधारे यांनी 'लोकशाही वाहिनी'सोबत संवाद साधला आहे. त्या काय म्हणाल्या? याबद्दल आपण आता सविस्तरपणे जाणून घेऊया.

सुषमा अंधारे म्हणाल्या की, "या प्रकरणाचा जाहीर निषेध आहे. आशा घटना पुणे सारख्या शहरात घडणे हे खूप धक्कादायक आहे. पुण्यातील कायदे व्यवस्थेवरची पकड आता सैल होत असलेली दिसून येत आहे. पोलिसांचा धाक नावाची काही गोष्ट उरलेली नाही. वारंवार प्रश्न उपस्थित केला जातो. पुण्यातील ज्या गर्दीच्या जागा आहेत. त्या ठिकाणी विशेषता शाळा, कॉलेज, बस स्टँड आणि रेल्वे स्टँड इथे पोलिसांची जास्तीची गस्त वाढवली पाहिजेत. मात्र, ते होताना दिसत नाही. आजची घटनाही फक्त गंभीर नाही. तर पुण्याच्या संस्कृतीला न शोभणारी आहे. या सर्व प्रकरणात पुण्याच्या पालकमंत्र्यांनी यात लक्ष घालावं आणि पुणे पोलिसांचा नेमकं चाललंय काय यावर पालकमंत्र्यांनी निश्चितपणे त्यांना जाब विचारावा".

पुढे सुषमा अंधारे यांनी परिवहन मंत्र्यांवरदेखील निशाण साधला आहे. त्या म्हणाल्या की, "परिवहन मंत्री या घटणेसाठी जबाबदार आहेतच. त्यांनी सगळ्या प्रकारची सर्वात आधी माहिती घेणे खूप महत्त्वाचे आहे. त्यांनी आशा ठिकाणी महिलांसाठी सुरक्षेची व्यवस्था करणे खूप गरजेचे आहे".

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?