रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत शिवसेना आजही आग्रही आहे, असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे. तसेच भरत गोगावले यांना पालकमंत्री पद मिळायला पाहिजे ही माझी भावना आहे, असं देखील उदय सामंत यांनी म्हटलं आहे. दाओसमध्ये 15 लाख 70 हजाराची एमओयू झाली असून त्यात 40 हजार कोटीची गुंतवणुक रत्नागिरीत झाल्याबद्दल मी समाधानी असल्याच वक्तव्य देखील उदय सामंत यांनी केलेलं आहे.
तसेच 40 हजार कोटीच्या गुंतवणुकीमुळे कोकणात सुबत्ता येईल असं आश्वासन उदय सामंत यांनी दिल आहे. मुस्लिम मतं काँग्रेसकडे होती, ती UBTकडे ट्रान्सफर झाली असं मोठ वक्तव्य देखील उदय सामंत यांनी केलेलं आहे. UBTचं राजकीय धोरण काय आहे हे नेमकं कळत नाही असं देखील उदय सामंत म्हणाले आहेत.
पुढे उदय सामंत म्हणाले की, संविधानाच्या बाबतीत फेक नेरेटीव्हचा फुगा आम्ही फोडून टाकलेला आहे... संविधानाच्या बाबतीत आमची आदराची भूमिका आहे, संविधान बदलण्याचा प्रयत्न करण्याचा विचार जो करेल त्याच्य विरोधात शिवसेना उभी राहील... अनेक आमदार हे एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकाराण्यास तयार झाले आहेत. त्यामुळे बाळासाहेबांच्या विचारांची खरी शिवसेना कोणती आहे, लोकांना कळायला लागले आहे...