ताज्या बातम्या

भरत जाधव यांच्या 'त्या' वक्तव्यावर पालकमंत्री उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया

Published by : Siddhi Naringrekar

.रत्नागिरी येथील नाट्यगृहात आपण पुन्हा पाय ठेवणार नाही असे सांगत प्रेक्षकांची जाहीर माफी मागणाऱ्या भरत जाधव यांच्या वक्तव्यावर पालकमंत्री उदय सामंत यांची पहिल्यांदाच आज मोठी प्रतिक्रिया आली आहे. भरत जाधव यांनी या गोष्टीचे नाहक भांडवल करत त्याचा इव्हेंट करायचा कि एपिसोड करायचा हा त्यांचा प्रश्न आहे असा टोला पालकमंत्री उदय सामंत यांनी लगावला आहे. मी इकडे येणार नाही मी तिकडे येणार नाही पण असं काही होत नाही आणि ते न आल्यामुळे सांस्कृतिक चळवळ काही थांबणार नाही अशा शब्दात पालकमंत्री उदय सामंत यांनी भरत जाधव यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. 25 मे रोजी आयोजित शासन आपल्या दारी उपक्रमाबाबत माहिती देण्याकरता आयोजित पत्रकार परिषदेत पालकमंत्री उदय सामंत रत्नागिरी येथे बोलत होते.ते पुढे म्हणाले की, सावरकर नाट्यगृहात कोणत्या त्रुटी असतील तर त्या नक्कीच दूर केल्या जातील असेही पालकंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. संयोजकांनी तीन तासाचे डिझेल टाकल्यानंतर ते चार तास पुरूच शकत नाही कार्यक्रम किती वेळ चालवायचा हा संयोजकांचा विषय आहे ज्यावेळेला आपण खातू नाट्यगृहात शो करत होतो त्या वेळेला तुम्हाला कुठेही जायची तयारी होती अशा स्वरूपाचा एका नाट्यरसिकाचा लेख आपण वाचला.

आता वि.दा.सावरकर नाट्यगृहात अतिशय चांगली सुविधा उपलब्ध झाली आहे. भरत जाधव यांच्या नाटकाच्या आधी तीन दिवस मी त्याच ठिकाणी केंद्रीय मंत्र्यांबरोबर कार्यक्रमासाठी होतो त्यावेळेला एसी चा कोणताही त्रास आम्हाला झाला नाही त्यामुळे आहे त्यापेक्षा उगाचच काहीतरी मोठे झाले आहे असं करून आविर्भाव आणत दाखवणं हे योग्य नाही अशा शब्दात उदय सामंत यांनी सुनावले आहे. मीही सांस्कृतिक क्षेत्रात अनेक वर्ष काम करत आहे आपण या सगळ्या लोकांना अनेक वर्ष बघत आहे. भरत जाधव मला कॉल करून बोलू शकले असते आठवड्या भरापूर्वी बेंगलोर येथे झालेल्या कार्यक्रमात भरत जाधव माझ्यासोबत होते. त्यासाठी त्यांना असा इव्हेंट करण्याची आवश्यकता नव्हती पण तो शेवटी त्यांचा प्रश्न आहे. परंतु या सगळ्याची दखल नक्की घेण्यात आली असून काही त्रुटी असल्यास त्या नक्कीच दूर केल्या जातील अशी ग्वाही पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. भरत जाधव यांनी माफी मागताना मला वाटलं त्यांनी प्रेक्षकांच्या तिकिटाचे काही पैसे परत दिले असतील असाही टोला पालकमंत्री उदय सामंत यांनी लगावला आहे.

HBD Madhuri Dixit: माधुरी दीक्षितने करिअरमधून का घेतला होता ८ वर्षांचा ब्रेक?

Kartiki Gaikwad: लग्नाच्या चार वर्षांनी कार्तिकी झाली आई

Bhandara : भंडारा शहरातील खड्यात रांगोळी काढून आंदोलन

Chhagan Bhujbal : अनधिकृत होर्डींग लावणारे भावेश भिडे ठाकरेंच्या जवळचे असल्याचा आरोप, भुजबळांची प्रतिक्रिया

Hoarding Collapse Mumbai: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर पुणे पालिका प्रशासनाची अनधिकृत होर्डिंग्सवर धडक कारवाई