Uday Samant. Ramesh Kadam Team Lokshahi
ताज्या बातम्या

उदय सामंतांची राष्ट्रवादीच्या माजी आमदारांना शिवसेनेत येण्याची ऑफर

माजी आमदार रमेश कदम शिवसेनेच्या (शिंदे गट) वाटेवर. पालकमंत्री उदय सामंत यांचेबरोबर बंद दाराआड चर्चा

Published by : shweta walge

निसार शेख, चिपळूण ; पालक मंत्री उदय सामंत यांनी राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदम यांच्या निवासस्थनी जाऊन भेट घेतली आणि बंद दारआड जवळपास २० मिनिटे चर्चा केली. यावेळी त्यांनी माजी आमदार रमेश कदम यांच्या कानात कुजबुज करून शिवसेनेत मार्गदर्शक म्हणून येण्याची ऑफर दिली.

त्यानंतर उदय सामंत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की, माजी आमदार रमेश कदम हे माझे राजकीय मार्गदर्शक आहेत. आज त्यांची सदिच्छा भेट घेऊन लवकरच त्यांनी शिवसेनेत आम्हाला मार्गदर्शन करावे असे त्यांच्या कानात सांगितले आहे. त्याचा विचार लवकरात लवकर करतील अशी आशा आहे. पालक मंत्री उदय सामंत म्हणाले मात्र राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदम यांच्या भेटीने राजकीय चर्चेला उधाण आले आहे यावर माजी आ रमेश कदम यांनी उतर देणे टाळले असेल तरी येत्या काही दिवसात चिपळूणची राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा