Team Lokshahi Marathi
Team Lokshahi Marathi
ताज्या बातम्या

इंदिरा काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांच्यावर उदय सामंत यांची जादू चालणार का?

Published by : shweta walge

रत्नागिरी, निसार शेख : चिपळूण काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रशांत यादव यांचा तालुका अध्यक्ष पदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय गोटात मोठी खळबळ उडाली आहे. काँग्रेसचे संभाव्य उमेदवार म्हणून प्रशांत यादव यांच्या नावाची चर्चा होती. मात्र प्रशांत यादव यांच्या राजीनाम्यानंतर जिल्ह्यात मागील आठवड्यातील उदय सामंत यांच्या भाषणाची चर्चा सुरू झाली आहे.

त्यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी जाहीर कार्यक्रमात प्रशांत यादव यांना शिंदे गटात प्रवेश करण्याची अप्रत्यक्ष ऑफर दिली त्यामुळे काँग्रेसचे संभाव्य प्रशांत यादव यांना उदय सामंत यांनी पळविले असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे रत्नागिरीतील आणखी एक मोठा नेता शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

मात्र राजीनामा नंतर प्रशांत यादव नॉट रीचेबाल असल्यामुळे वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की रत्नागिरी जिल्ह्यात काँग्रेसला आणखी मोठा धक्का बसला असून चिपळूणचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी आपल्या तालुकाध्यक्ष पदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे. काँग्रेसच्या चार माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आता लगेचच तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी राजीनामा दिल्याने उलट सुलट चर्चाना उधाण आले आहे. काही दिवसांपूर्वी पालकमंत्री उदय सामंत यांनी एका कार्यक्रमात भाषण करताना प्रशांत यादव यांना दिलेली ऑफर त्यांनी खरोखर स्वीकारली का, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. राजीनामा दिल्यानंतर प्रशांत यादव हे नॉट रीचेबल झाले असून प्रशांत यादव देखील आता शिंदे गटात सामील होणार का, हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.

Patanjali: बाबा रामदेव पुन्हा अडचणीत; पतंजलीवर मोठी कारवाई

Dengue: राज्यात मागील पाच वर्षांत डेंग्यूच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ

RCB VS CSK: आरसीबीने 27 धावांनी विजय मिळवून प्लेऑफमध्ये केली दमदार एन्ट्री

Megablock: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य रेल्वेवर 15 दिवस मेगाब्लॉक; तर काही गाडया रद्द

साताऱ्यातील मिनी काश्मीर आणि महाबळेश्वरमध्ये बरसला अवकाळी पाऊस