ताज्या बातम्या

'शरद पवारांनी स्वतःच्या जीवावर काहीही केलेले नाही' उदयनराजेंचा टोला

उदयनराजे भोसले यांनी शरद पवारांवर निशाणा साधत म्हटले की पवारांनी स्वतःच्या जीवावर काहीही केलेले नाही. महायुतीने सातारा जिल्ह्याला चार मंत्री दिल्याने त्यांनी महायुतीचे आभार मानले.

Published by : shweta walge

मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी आज जलमंदिर येथे जाऊन खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. यावेळी निवडणुकीत मिळालेल्या मदतीबद्दल त्यांनी उदयनराजेंचे आभार मानले तर यावेळी बोलताना खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील मंत्री मकरंद पाटील यांच्या आजपर्यंतच्या कामाचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच यावेळी बोलताना त्यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.

ते म्हणाले की, पवार साहेबांनी लक्ष्मणतात्यांच्या मुलाला पाडण्यासाठी जी विधाने केली, ती चुकीची होती. त्यामुळे मी वाई मतदार संघातील जनतेला आबांची कॉलर टाईट करायला सांगितली होत. खरतर पवार साहेबांनी आता तरुणांना प्रोत्साहन देण्याची गरज असून ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी मुठभर मावळ्याचे जीवावर स्वराज्य उभारले तसेच पवार साहेबांनी स्वतःच्या एकट्याच्या जीवावर काही केलेलं नाही. त्या काळाच्या ज्या लोकांनी साथ दिली त्यात मकरंद पाटलांचे वडील सुद्धा होते असा टोला यावेळी उदयनराजेंनी लगावला. महायुतीने सातारा जिल्ह्याला चार मंत्री दिल्याने महायुतीचे आभार सुद्धा त्यांनी मानले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मंत्री गिरीश महाजन आझाद मैदानात शिक्षक आंदोलकांच्या भेटीला

आजचा सुविचार

Guru Purnima 2025: 'गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु...'; गुरुपौर्णिमा दिनानिमित्त आपल्या गुरुंना द्या 'या' खास शुभेच्छा

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींना आर्थिक लाभ मिळेल, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य